दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी घरगुती उपाय

एका जागेवर बराच वेळ बसून काम असल्यास, शरीरात पोषक घटकांचा अभाव असल्यास, रात्री एकाच कुशीवर जास्तवेळ झोपल्याने आपल्या मानेची शीर भरून येते.  मानेच्या खालच्या बाजूला प्रचंड वेदना व्हायला लागतात अशावेळी नेमके कोणते घरगुती उपाय आपण करू शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत.

नस दबल्यावर त्याजागी वेदना होत असल्यास आपण एका वाटीत दोन चमचे मोहरीचे तेल घ्या त्यामध्ये लसणाची पाकळी ठेचून टाका. आणि हे मिश्रण गरम करा. त्यानंतर तेल कोमट असताना त्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने मानेच्या नसा मोकळ्या होतील.

मानेच्या नसा भरून आल्यावर आपण पारिजातकाच्या पानांचा काढा दिवसातून 2 वेळा पिवू शकता. पारिजातकाच्या पानांचा काढा प्यायल्याने वेदना कमी होऊन आराम मिळतो.

पारिजातकाच्या पानांचा काढा बनवण्यासाठी अंदाजे 50 ग्राम पारिजातकाची पाने हाताने बारीक तुकडे करून पातेल्यात घ्या त्यामध्ये अर्धा 400 मिली पाणी मिसळा त्यानंतर गॅसवर हे मिश्रण अर्धे होई पर्यंत उकळा. नंतर गॅस बंद करून काढा खाली उतरवा काढा कोमट असताना प्या. हा काढा प्यायल्याने नसा मोकळ्या होतील. आणि आपल्याला आराम वाटेल.

मानेच्या नसा भरून आल्यावर अंघोळीच्या गरम पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने वेदना कमी व्हायला मदत मिळते. आपल्याला दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page