दातदुखी, दाढदुखी वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

दातदुखीच्या त्रासातून आपण प्रत्येक जण एकदा तरी जातोच. काही वेळा दातदुखी इतकी वेदनादायक असते की तुमच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होऊ लागतो. पण जेव्हा वेदना दाढीमध्ये असते तेव्हा आणखी समस्या उद्भवू शकतात.

कधी कधी दातांमध्ये किड झाल्यामुळे वेदना होतात, तर कधी हिरड्यांच्या इतर समस्येमुळे दात दुखू लागतात. तसेच दातांची मुळे खूप सैल झाल्याने ही दातांमध्ये असह्य वेदना होतात.

अशा वेळी ब्रश करणे ही खूप कठीण होऊन बसते आणि श्वासाची दुर्गंधीही सुरू होते. आज आपण दातदुखी टाळण्यासाठी घरगुती उपाय काय करता येऊ शकतात ते जाणून घेणार आहोत.

लसणामधील औषधी गुणधर्म दातदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. दातदुखी झाल्यास लसणाची एक पाकळी घेऊन त्याची पेस्ट बनवा आणि प्रभावित दातावर लावा. असे केल्याने वेदना कमी होऊन तुम्हाला थोड्याच वेळात आराम मिळेल.

लवंग हा दातदुखीच्या उपचारात वापरला जाणारा पारंपारिक उपाय आहे. प्राचीन काळापासून दातदुखीसाठी याचा वापर केला जात आहे. जेव्हा जेव्हा दातांमध्ये दुखत असेल तेव्हा लवंग दातांमध्ये दाबून ठेवा. याशिवाय लवंग पावडर किंवा त्याचे तेल वापरूनही दातदुखीपासून आराम मिळतो.

दातांच्या तीव्र दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी चिमूटभर काळी मिरी पावडर एक चतुर्थांश मिठात मिसळून दुखणाऱ्या जागेवर लावल्यास कमी वेळात आराम मिळतो.

तीन ते चार थेंब मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ मिसळून दात आणि हिरड्यांवर मसाज करा. यामुळे दातदुखीपासून आराम तर मिळतोच पण हिरड्या ही मजबूत होतात.

पेरूची पाने दातदुखीवर उत्तम उपचार मानली जातात. पेरूची ताजी पाने घेऊन त्याचा छोटा तुकडा करायचा आणि ते पान दुखणाऱ्या दातावर दाबून धरायचे असे केल्याने खूप आराम मिळतो. ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने तोंड धुतल्यानेही दातदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते.

आपल्याला दातदुखी, दाढदुखी वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page