दात दुखी घरगुती उपाय

रात्री झोपायच्या आधी गोड पदार्थ खाल्याने, जोराजोरात दात घासल्याने अचानक दात दुखी सुरु झाल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अचानक दात दुखी सुरु झाल्यास थोडेसे सैंधव मीठ कोमट पाण्यात मिसळून त्या पाण्याने खळखळून गुळण्या करा. असे  केल्याने दातांमध्ये अडकलेले अन्न कण निघून जाऊन वेदना कमी होतील.

दात दुखी कमी करण्यासाठी एक लवंग चघळा; लवंगेमध्ये असणाऱ्या युजेनॉल या एंटिइन्फ्लेमटरी घटकामुळे दात दुखी थांबायला मदत मिळते.

दात दुखीमुळे हिरड्या सुजल्या असल्यास सुंठेचा वापर करता येऊ शकतो यासाठी सुंठेचा लहानसा तुकडा दात दुखत असलेल्या बाजूला ठेवून चघळा असे केल्याने सूज कमी होऊन वेदना नाहीश्या व्हायला मदत मिळेल.

दात दुखी कमी करण्यासाठी बऱ्याचदा हिंगाचा वापर केला जातो; हिंगामध्ये असणाऱ्या एंटिइन्फ्लेमटरी गुणधर्मामुळे वेदना कमी व्हायला मदत मिळते. यासाठी ज्या बाजूला दात दुखत आहे त्याठिकाणी थोडीशी हिंग पावडर लावा. पेरूची कोवळी पाने चघळल्याने दात दुखी, दाढ दुखी कमी व्हायला मदत मिळते.

अचानक दात दुखी होऊ नये यासाठी दाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या. दिवसातून दोन वेळा दात घासायची सवय करा, अति गोड पदार्थ खाणे टाळा, जेवण केल्यावर पाण्याने गुळणा करा, जोराजोरात दात घासू नका.

आपल्याला दात दुखी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page