डायबेटीस, कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी कमी होण्यासाठी उपयोगी असणाऱ्या चिंचेचे आरोग्यदायी फायदे

चिंच अस नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटते. चिंचेची आंबट आणि गोड चव सगळ्यांनाच आवडते. चिंचेचा वापर अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. आज आपण चिंचेचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

चिंचेमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-अस्थमाटिक घटक असतात. याबरोबरच चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, झिंक, लोह असे अनेक पोषक घटक आढळतात. चिंचेचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. चिंच हृदयासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.

चिंचेचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत मिळते. चिंचेमध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे पाचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.

चिंचेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहायला मदत मिळते. चिंचेमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे सांधेदुखी कमी व्हायला मदत मिळते.

चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन आणि झिंक असे पोषक घटक असतात. त्यामुळे चिंचेचे सेवन केल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते.

चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दूर करण्यासाठी चिंचेचा वापर केला जाऊ शकतो. प्रवासात बऱ्याच जणांना मळमळ, उलट्या असा त्रास होत असतो. अशावेळी चिंचेचे सेवन केले तर उलट्या मळमळ होत नाही.

आपल्याला चिंचेचे आरोग्यदायी फायदे  हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page