हुकुमशहांच्या राज्यात कधीही काहीही निर्णय घेतले जातात. चीन तसा हुकुमशाही राष्ट्र. चीन जसा हुकुमशाहीसाठी प्रसिद्ध तसा तो तिथल्या कथा आणि किस्स्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. साठच्या दशकात माओ नं एक हुकुम काढला.
चिमण्या शेतात शिरून पीकांचा नास करतायेत. याला रोखण्यासाठी चीन मधल्या सर्व चिमण्यांची कत्तल करण्याचा त्याने आदेश जारी केला. आता माओला ना म्हणणं म्हणजे देशद्रोहच करण्यासारखं. सारी यंत्रणा, नागरिक कामाला लावले गेले.
चिमण्या टिपून ठार केल्या गेल्या. पण याचा भलताच परिणाम झाला. चिमण्या संपवल्याने शेतात किटकांची बेशुमार वाढ झाली आणि उभी पीक किटकांच्या प्रादूर्भावाने मरून गेली. इकोसिस्टीम ला बाधा आणल्यामुळे हजारो एकरांवरील शेती नष्ट झाली. परिणामी चीनमध्ये अन्नधान्यांच्या टंचाईने तब्बल आठ कोटी लोक प्रभावित झाले. आणि उपासमारीमुळे चार कोटी लोकांना प्राण गमवावं लागलं.
६० च्या दशकात चीन सरकारने शेतकऱ्यांना उपद्रव होतो ह्या सबबीखाली देशातील सर्व चिमण्यांना मारण्याचा निर्णय घेतला. ह्या अविचारी निर्णयाची परिणीती पुढे भयंकर दुष्काळामध्ये झाली ज्यामध्ये अंदाजे ४ कोटी लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले. १९५८ ते ६२ ह्या काळात चीन सरकारने ‘फोर पेस्ट्स कॅम्पेन’ (४ प्रकारच्या उपद्रवी कीटकांचा नाश उपक्रम) किंवा ‘किल अ स्पॅरो कॅम्पेन’ (चिमण्यांना मारा उपक्रम) हाती घेतला.
सरकारचे असे म्हणणे होते की उंदीर, डास आणि माश्या हे अनुक्रमे प्लेग, मलेरिया आणि टायफॉईड रोगांस कारणीभूत असल्यामुळे खूप नुकसान करतात. चिमण्या शेतातील धान्य आणि फळे खात असल्यामुळे त्यांना पण ह्या यादीत समाविष्ट करण्यात आले.
फोर पेस्ट कॅम्पेनच्या प्रसारासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या. शाळा, महाविद्यालयांत अनेक उपक्रम राबविण्यात आले तसेच स्थानिक पातळीवर अनेक जनजागृती मोहीमा हाती घेण्यात आल्या. अगदी थोड्याच दिवसात ह्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला.
चिनी लोक सापळे लावून चिमण्या पकडू लागले. बंदुकीने, गोफणीने चिमण्यांची शिकार करू लागले. त्यांचे घरटे उध्वस्त करू लागले. ड्रम, वाद्ये ह्यांच्या साहाय्याने मोठमोठे आवाज काढुन चिमण्यांना पिटाळू लागले. गरीब बिचाऱ्या चिमण्या ह्या त्रासाने वैतागून दमून खाली पडू लागल्या आणि क्रूरपणे मारल्या जाऊ लागल्या.
संहार प्रक्रिया खालीलप्रमाणे होते. हे ज्ञात आहे की चिमण्या 15 मिनिटांपेक्षा जास्त उड्डाण करु शकत नाहीत, त्यानंतर त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते. सर्व गावकरी शेतात बाहेर पडले आणि विविध वस्तूंनी गडबडले, ओरडले, गरीब चिमण्या मरेपर्यंत हात फिरवले. शहरांमध्येही हेच घडले – रहिवासी गोंगाट करीत होते, चिमण्यांना ठार मारत होते. उपक्रम काळामध्ये अंदाजे १०० कोटी चिमण्या, १५० कोटी उंदीर, करोडो माश्या आणि डास मारण्यात आले. एकंदरीत चिनी सरकारचा उपक्रम यशस्वी झाल्यात जमा होता.
पण निसर्गावर केलेल्या ह्या आक्रमणाचा जबरदस्त तडाखा चीनला सोसावा लागला. चिमण्यांच्या बेसुमार कत्तलीमुळे शेतीचा नाश करणाऱ्या अनेक कीटकांची (टोळ, नाकतोडे, इ.) संख्या अनियंत्रितपणे वाढू लागली. ह्या कीटकांचा फडशा पाडून शेतीचे रक्षण करणाऱ्या चिमण्याच नसल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी घट होऊ लागली.
सुरुवातीला १५% असणारी ही घट पुढे चक्क ७०% पर्यंत पोचली. सामान्य जनतेवर ह्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला. अन्नधान्याच्या तुटवड्याची आणि निसर्गाचा समतोल बिघडवल्याची परिणीती दुष्काळात झाली. पुढील काही वर्षात भयंकर उपासमारीने चीन मध्ये थैमान घातले. ज्यात अंदाजे २ ते ४ कोटी लोक मृत्युमुखी पडले.
चिनी सरकारला आपली चूक समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. पुढे काही वर्षांनी त्यांनी फोर पेस्ट कॅम्पेनमधून चिमणीला वगळले आणि त्याजागी ढेकूणांची भरती केली होती. पण त्याने जास्त काही फरक पडला नाही. ह्या सर्व खटाटोपामध्ये चीनमध्ये चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर जाऊन पोचली.