चिमाजी अप्पानी अभिनव शक्कल लढवून जिंकलेला “तारापूरचा जलदुर्ग”

शूर मावळ्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. त्यात जलदुर्गांचे प्रमाण काही कमी नाही. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा असे जलदुर्ग सोडले तर बाकी सर्व जलदुर्ग अनेकांना अपरिचितच आहेत. याच अपरिचित किल्ल्यांपैकी एक म्हणजे तारापूरचा किल्ला.

हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात येतो. सध्या हा किल्ला खाजगी वहिवाटदारांच्या कुलुपात बंदिस्थ झाला आहे. त्यामुळे अनेक दुर्ग प्रेमींना हा किल्ला पाहणे नशिबी नाही असे म्हणावे लागेल.हा किल्ला तारापूर खाडीच्या दक्षिण तीरावर वसला आहे.

घडीव काळ्या पाषाणातील हा किल्ला १५९३ रोजी पोर्तुगीजांनी बांधला. या किल्ल्याच्या तीन बाजूस असलेला खंदक, मजबूत अशी ३५ फूट उंचीची आणि १० फूट रुंदीची तटबंदी या किल्ल्याचे वैभव वाढवते.

या किल्ल्यांचा डोळ्यात न सामावणारा दरवाजा, दरवाजावरील कड्या प्रत्येक दुर्गप्रेमींना आकर्षित करतात. दरवाजाच्या दोनही बाजूस पाहरेकरांच्या देवड्या आहेत.

प्रवेशद्वाराच्या छतावर असलेले दगडी घुमट, विहीर, चिमाजी अप्पानी स्थापन केलेली मारुती रायाची सुंदर मूर्ती, दिंडी दरवाजा, गडाच्या अलीकडे असलेले तारकेश्वराचे महादेव मंदिर आणि या मंदिर परिसरात असलेल्या काही मुर्त्या पाहायला मिळतात.

पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर कब्जा केला आणि केल्याची पुनर्बांधणी केली. १७३८ मध्ये या किल्ल्यावर चिमाजी आप्पा यांनी हल्ला चढविला. त्यांनी संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि हल्ला केला. अशाप्रकारे पोर्तुगिजांचा पराभव करण्यात चिमाजी आप्पा यांना यश आले. परंतु बाजी भीवराव रेठरेकर धारातीर्थ पडले.

आपला एक मावळा गेल्याचे दुःख बाजीराव पेशव्यांना झाले. त्यांनी बाजींच्या मातोश्री यांना पात्र धाडले. लिहले की ”बाजी भिवराव तोंडात गोळा घालुनी कैलासवासी जाहले. ईश्वर मोठे अनुचित केले. तुम्हास मोठा शोक जाहला. आमचा भाऊ गेला.. बाजू गेली.. उपाय नाही…”

चिमाजी अप्पानी अभिनव शक्कल लढवून हा किल्ला जिंकला.या किल्यावर विजय मिळवून एक नवा इतिहास तर लिहला गेला, परंतु बाजींच्या बलिदानाने इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहले गेले. जे आजही जिवंत आहे आणि त्यांच्या पराक्रमाची ही गाथा अमर झाली.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

Leave a Comment

You cannot copy content of this page