सारखा सारखा राग येणे, चिडचीडेपणा कमी होण्यासाठी घरगुती उपाय

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो; राग येणे हा माणसाचा स्वभाव गुण आहे. योग्य वेळी राग येणे ठीक आहे; मात्र सारखा सारखा राग येत असेल तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोर जाव लागत.

महिलांना मा’सिकपाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोन बदलामुळे चीडचीड होत असते. चीडचिडेपणा वाढल्यामुळे झोप न येणे, एसिडीटी, डोकेदुखी, मायग्रेन, उच्च रक्तदाब, पोटात अल्सर होणे अशा समस्या होऊ शकतात.

म्हणूनच आज आपण चीडचिडेपणा कमी होण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चिडचिडेपणा कमी होण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये पुढील बदल करू शकता. सकाळी झोपेतून लवकर उठा, सकाळी मोकळ्या हवेत चालायला जा. थोडावेळ शारीरिक व्यायाम करा.

सकाळी 15 मिनिटे मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने मानसिक आणि शारीरिक ताण कमी होऊन आपल्या शरीरातील हार्मोन पातळी संतुलित व्हायला मदत मिळते. रात्री चांगली झोप लागण्यासाठी आपण झोपायच्या आधी देखील मेडिटेशन करू शकता.

आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत काही वेळ बोलल्याने मानसीक ताण तणाव कमी होतो. आपल्या आवडीचे संगीत, गाणी ऐका असे केल्याने मनावरील ताण कमी होऊन चिडचिड होणे कमी व्हायला मदत मिळते.

मोबाईलचा वापर कमी केल्याने देखील चिडचिडेपणा कमी होतो. दिवसभरात एक ठरविक वेळ ठरवून त्यावेळीच मोबाईलचा वापर करा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. आपल्याला एखादे व्यसन असेल तर त्यापासून दूर रहा. या सर्व गोष्टींची हळहळू एक एक करून स्वताला सवय लावल्यास चिडचिडेपणा कमी होतो.

आपल्याला चिडचीडेपणा कमी होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page