कांजण्या आजार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात?

कांजण्या हा आजार एक संसर्गजन्य आजार आहे. यालाच इंग्लिशमध्ये chickenpox असे म्हटले जाते. कांजण्या हा आजार मुख्यत लहान मुलांमध्ये होताना आढळून येतो. ह्या आजारात ताप येतो, संपूर्ण अंगाला खाज सुटते, अंग लालसर होते, आणि त्वचेवर फोड येतात.

ज्या मुलांना लहानपणी कांजण्या आजाराची लस दिलेली नाही आहे त्यांना कांजण्या आजार होण्याची शक्यता असते. आज आपण कांजण्या आजार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात हे जाणून घेणार आहोत.

कांजण्या आजार होण्याआधी आपल्याला ताप येऊ शकतो, सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते. कांजण्या आजार होण्याआधी आपल्याला थकवा जाणवू शकतो. हा आजार होण्याआधी आपली भूक मंदावू शकते.

हि लक्षणे आढळून आल्यानंतर 1ते 2 दिवसात अंगावर लाल पुरळ यायला सुरुवात होते. साधारणपणे 7 ते 10 दिवस आपल्या अंगावर फोड येत असतात. त्यानंतर हे फोड निघून जातात.

कांजण्या आल्यावर अंगाला खाज येत असते. मात्र हे फोड फोडल्यास त्यामधून पाणी सदृश्य घटक बाहेर पडून डाग पडू शकतात. त्यामुळे कांजण्याचे फोड फोडू नका. कांजण्यामुळे अंगाला खाज येत असल्यास त्यावर कडूलिंबाच्या पानाची पेस्ट करून लावल्यास खाज येणे थांबून आपल्याला लवकर आराम मिळू शकतो.

आपल्याला कांजण्या आजार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात? हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक केले पाहिजे.

या माहितीत काही बदल सुचवायचे असल्यास आपण आम्हाला मेसेजमध्ये सांगू शकता. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page