छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाबाईंचे सहावे पुत्र?

परिचित असलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही ऐकीव गोष्टी माहिती आहेत. जसे की खानाची बोटे छाटली, सुरत लूट, अफजल खानाचा कोथळा फाडला. हा इतिहास सोडला तर बाकी इतिहास आपल्याला अपरिचित आहे.

तुम्ही कधी हे ऐकले आहे का की शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचे सहावे अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते? हो.. हे खरं आहे.

कवींद्र परमानंद लिखित श्रीशिवभारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सहावे पुत्र असल्याचा उल्लेख आहे. कवी परमानंद म्हणतात, तस्य तस्यामजायन्त पुत्राष्षट् शुभलक्षणा:। तेषां मध्ये शंभुशिवौ द्वावेवान्वयवर्धनौ।। याचा अर्थ असा की, “त्यास तिच्यापासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले. त्यापैकी शंभू आणि शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले.”

संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ बंधू होते. संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये चार अपत्ये होते, परंतु काही कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला. पुढे संभाजीराजे अफलजल खानाकडून मारले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे अखेरपर्यंत माँसाहेब जिजाऊंच्या सहवासात राहिले.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. संदर्भ- शिवभारत

Leave a Comment

You cannot copy content of this page