छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेमागचा इतिहास

३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवरायांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सर्व जबाबदारी युवराज छत्रपती संभाजी महाराजांवर आली. गनिमांना धडा शिकवण्यासाठी आणि स्वराज्याचे नेतृत्व करण्यासाठी १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.

संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. नवीन राजाला राज्यकारभार करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा गरजेची असते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला माहीतच असेल तशीच छत्रपती संभाजी महाराजांची देखील स्वतंत्र राजमुद्रा आहे.

१६ जानेवारी १६८१ रोजी शंभू राजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती झाल्यानंतर संभाजीराजांनी स्वतःची राजमुद्रा तयार करवून घेतली. संस्कृत भाषेमध्ये असलेल्या या राजमुद्रेचा आकार पिंपळाच्या पानासारखा असून त्यावर १६ बुरुज आहेत. या राजमुद्रेवरसंस्कृत भाषेमध्ये काही ओळी लिहिलेल्या आहेत.

संस्कृत भाषेमध्ये या काही ओळी लिहलेल्या श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।या राजमुद्रेचा मराठीतून अर्थ असा होतो छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची हि राजमुद्रा जणूकाही स्वर्गीय तेजाने तळपत आहे.

आकाशा प्रमाणे अमर्याद आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल छत्रपतींच्या या राजमुद्रे पेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. याच राजमुद्रेच्या आधारावरती छत्रपती संभाजी महाराजांचा त्या काळी राज्य कारभार चालत असे.

आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेमागचा इतिहास ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page