छत्रपती आणि छत्रसाल यांची ऐतिहासिक भेट

बुंदेलखंड मध्ये शहाजहानच्या काळापासून राजा चंपतराय राज्यकारभार करत होते. औरंगजेबाला जेंव्हा मयूर तख्तावर ताबा मिळवण्यासाठी पित्या विरुद्ध बंड केले त्यावेळी चंपतरायाने त्याला मदत केली होती. पण ही मदत विसरून बादशाहने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्या हातून फार बमोठी चूक झाली असं राहून राहून चपंतराय यांना वाटू लागले या त्रासाने त्यांनी व त्यांच्या पत्नी लालकुवर सह जीवनयात्रा संपवली.

यावेळी त्यांचा पुत्र छत्रसाल  हा केवळ ११ वर्षाचा होता.त्याच्या कपटा ने आपल्या आई वडिलांची जीवनयात्रा संपली यामुळे त्यांच्या मनात औरंगजेब चा फार राग होता, परंतु दुर्दैवाने छत्रसाल काही करू शकत नव्हते स्वतःच्या इच्छेविरुद्ध त्यांना मोगलांची चाकरी करावी लागत होती. १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग हे जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आले त्यावेळी मिर्झाराजे यांच्या सेनेत छत्रसाल होता.

एक हिंदू राजा ज्याची स्वतःची कुठलीही पार्श्वभूमी नसताना सर्व मुस्लीम सत्तेशी निडरपणे आणि खंबीर असा यशस्वी लढा देत आहेत, हे पाहून त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले.

छत्रसाल मोगल सेनेत असताना भरपूर पराक्रम केला. मात्र त्या पराक्रमाचे श्रेय मात्र त्यांना कधीच मिळालं नाही. पुढे दिलेरखानाला दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले त्यावेळी देखील पराक्रम छत्रसाल यांचं मात्र श्रेय किंवा कौतुकाचा वाटेकरी दिलेरखान यांना मिळत. छत्रसाल यांना याचा प्रचंड राग आला.

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले. पुरंदर तहाच्या वेळी स्वराज्याच झालेलं नुकसान पाहता. शिवाजी महाराजांनी स्वतःला स्वराज्याच्या कामासाठी झोकून दिलं.

१६७१- ७२ ला दिलेरखानाच्या नेत्रत्वाखाली परत छत्रसाल मोगलांच्या साठी काम करण्यासाठी महाराष्ट्रात आला. स्वतःच्या कर्तृत्वाचा योग्य ठिकाणी उपयोग व्हावा म्हणून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याची इच्छा अनावर झाली. शिकारी चं कारण सांगून छत्रसाल बुऱ्हाणपूर वरून आपल्या बायका मुलासह गुपचुपपणे महाराजांच्या भेटीला आले.

छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी कृष्णा नदीच्या काठावर छावणीत होते. अशी माहिती छत्रसाल यांचा सहकारी गोरेलाल तिवारी यांनी दिली. शेवटी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची छावणी दिसली आणि तेथे राजांच्यापुढे नतमस्तक झाले. छत्रसाल बुंदेला आपल्याला भेटायला येत आहेत याचा शिवाजी महाराजांना आनंद झाला.

महाराजांनी छत्रसाल यांचे मनापासून आदरातिथ्य केलं. गोरेलाल तिवारी यांनी छत्रसाल यांच्या भेटीचे कारण सांगितले. त्याने स्वराज्यात चाकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली मोगलांच्या इथे काम करण्यापेक्षा मला स्वराज्यात सैनिक म्हणून काम करायला आवडेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी ही गोष्ट खरंतर खुप अभिमानाची होती, त्यांना छत्रसाल बुंदेला यांचा पराक्रम ठाऊक होता महाराजांनी त्यांना सांगितले कि. तुम्ही पराक्रमी आहात, आमच्याकडे आलात तर तुमचा पराक्रम आमच्यामुळे झाकोळला जाईल, आम्ही जसं इथे स्वतःच स्वराज्य उभं केलं तसं तुम्ही बुंदेलखंड येथे उभं करा. तेव्हा तुम्ही जा, मोगालाविरूढ लढा उभा करा. ते मुघल जरी स्वतःला हत्ती समजत असतील तर तुम्ही सिंह आहात हे विसरू नका.

छत्रसाल यांना स्वतःच्या स्वराज्याबद्दल असा विचार आला नव्हता. आत्ता च्या घडीला जरी तुमच्या कडे सैन्य आणि युद्धसाहित्य नसेल तर आम्हाला विश्वास आहे तुम्ही ते उभं कराल, कारण आई भवानी आणि ब्रजनाथ श्रीकृष्ण यांचा वरदहस्त तुमच्या वर नक्की असेल.

छत्रसाल स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर एक महिना होता. या एक महिन्यात महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमाने वागणूक दिली त्यांना राजकारणाचे धडे दिले, धनुर्विद्या शिकवली, तलवार बाजी आदी युद्धाच्या अनेक गोष्टी सांगितल्या. स्वतःची तलवार काढून छत्रसालाला यांना भेट म्हणून दिली.

महाराजांची प्रेरणा घेऊन छत्रसालाने बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण केले. छत्रसाल हे ऐंशी वर्ष जगले आणि त्यांचं राज्य पुढे १२५ वर्ष कर्तृत्वाच्या जोरावर टिकले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल बुंदेला याचं वर्णन गोरेलाल तिवारी यांनी छत्रप्रकाश या त्यांच्या ग्रंथात केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page