चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उपाय

आपल्या चेहऱ्याची त्वचा हि नाजूक असते. त्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशाचा आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर लवकर परिणाम दिसू लागतो. चेहऱ्यावर टॅनिंग येत, तसेच वातावरणात असणाऱ्या धूळ, प्रदूषण याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर लवकर दिसून येतो. आपला चेहरा काळपट दिसू लागतो. म्हणूनच आज आपण चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत.

आपल्या चेहऱ्याची त्वचा तेलकट असल्यास एका वाटीत 2 चमचे मसूर डाळीचे पीठ घ्या त्यामध्ये गुलाबजल किंवा पाणी मिसळून पेस्ट बनवा हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

चेहऱ्यावर चंदन पावडरचा लेप लावल्याने देखील चेहऱ्याचा रंग उजळायला मदत होते. यासाठी एका वाटीत 2 चमचे चंदन पावडर घ्या त्यामध्ये गुलाबजल मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. आपल्याला फरक दिसून येईल.

चेहरा ताजातवाना वाटण्यासाठी आणि चेहरा उजळून निघण्यासाठी आपल्या आहारात पपईचा समावेश अवश्य करा. पपईचे सेवन केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात. पिकलेल्या पपईचा गर आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो.

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी रात्री  झोपायच्याआधी चेहऱ्यावर कोरफड गर/जेल लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. आठ ते दहा दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला फरक दिसू लागेल. रात्री चेहऱ्याला हळद आणि दुधाचे मिश्रण लावल्याने चेहरा उजळतो.

आपल्याला चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page