चेहऱ्यावरील वांग डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपण स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा. आपल्या चेहऱ्याची त्वचा हि नाजूक असते. आपण बऱ्याचदा कडक उन्हात बाहेर पडतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात त्यालाच वांग असे म्हणतात.

ग’रोदरपणात शरीरात होणाऱ्या हा’र्मोन बदलांमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग येऊ शकतात. ग’रोदर असताना त्वचेच्या काही भागात अधिक मेलानीन तयार झाल्याने वांग येऊ शकतात. आज आपण चेहऱ्यावरील वांग डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडा लिंबाचा रस घ्या आणि चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग आले आहे त्या भागावर लावा, साधारणपणे 20 मिनिटे राहूद्या. त्यांतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. हा उपाय एक महिनाभर केल्याने चेहऱ्यावरील वांगचे डाग नाहीशे होतील.

वांगचे डाग जाण्यासाठी आपण हळद वापरु शकता. हळदीचा वापर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी हजारो वर्षांपासून केला जातो. वांगचे डाग जाण्यासाठी रात्री झोपायच्या आधी हळद पावडर मध्ये थोडेसे दुध मिसळून वांग असलेल्या जागेवर लावा.

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, वांग नाहीशे होऊन चेहरा पहिल्यापेक्षा सुंदर दिसू लागेल. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग, वांग घालवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता.

यासाठी कांदा किसून त्याचा 2 चमचे रस काढा. नंतर हा रस कापसावर घेऊन वांग असलेल्या जागेवर लावा. सुकल्यावर पाण्याने धुऊन टाका. हा उपाय काही दिवस केल्याने काळे डाग कमी होतील.

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असतात. आपण चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर ऍपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब आणि गुलाबजलचे काही थेंब घ्या. त्यानंतर ते चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा.

15 मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नाहीशे होतात. आपल्याला चेहऱ्यावरील वांग डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page