चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

सगळ्यांना आपला चेहरा सुंदर दिसायला हवा असे वाटते. आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने वापरत असतो. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. कुणाची त्वचा कोरडी असते तर कुणाची त्वचा ही तेलकट असते. आपला चेहरा जर तेलकट असेल तर त्यावर मेकअप हि टिकत नाही.

तसेच चेहऱ्यावर तेलकटपणा असल्याने मुरूम, व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स येतात. आज आपण जाणून घेणार आहोत तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय चेहऱ्यावर तेलकटपणा असल्यास आपल्या चेहऱ्यावर थोडेसे मध लावा. 10 – 15 मिनिटांनी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

असे केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल. मध हे त्वचेसाठी सर्वात चांगली वस्तू आहे. चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी 1 लिंबू अर्धे कापून ते चेहऱ्यावर चोळा आणि २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ  पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते.

चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी कोरफडाची जेल झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला लावा आणि रात्रभर तसेच राहूद्या. सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा बघा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.

रात्री झोपण्यापूर्वी काकडीचे तुकडे चेहऱ्यावर चोळा. यानंतर, सकाळी साध्या पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. रोज रात्री असे केल्याने पिंपल्स कमी होतील. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल.

टॉमेटोमध्ये सॅलिसालिक असिड असते. जे आपल्या तेलकट त्वचेमधील तेल शोषून घेण्यास मदत करत.  यासाठी एक चांगला पिकलेला टॉमेटो घ्या त्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये 1 चमचा साखर मिसळा. हे मिश्रण सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या चेहऱ्यावर चोळा. त्यानंतर साधारण 5 मिनिट्स चेहऱ्यावर तसंच ठेवा. त्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुऊन कोरडा करा. असे केल्याने चेहऱ्यात फरक जाणवेल.

तेलकट त्वचेसाठी 2 चमचे चण्याच्या डाळीचे पीठ घ्या थोड्याश्या पाण्यात ते पीठ चांगले मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहर्याडवरील चिकटपणा दूर होतो.

चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा. यासाठी थोडासा कापूस घ्या त्यावर गुलाब पाणी घ्या. ते आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास तसेच राहुद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपल्या ला लवकर फरक जाणवेल. गुलाबाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, अँटीमाइक्रोबियल आणि जीवनसत्त्वे असतात.

चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी 2 चमचे मुलतानी माती घ्या. त्यामध्ये  २ ते ३ थेंब लिंबाचा रस आणि 1 चमचा दही यांचे चांगले  मिश्रण तयार करुन घ्या. त्यानंतर  चेहरा स्वच्छ धुवून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन घ्या. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून 2  वेळा हा पॅक चेहऱ्याला लावा.

आपली त्वचा तेलकट असेल तर लक्षात असुद्या आपला चेहरा साफ करण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा. जंक फूड आणि जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न पदार्थ खाऊ नका.

दिवसातून 3-4 वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आपल्याला चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page