चेहऱ्यावरील तीळ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

शरीरावर काही तीळ आपल्या आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. परंतु जर चेहर्या वर प्रमाणापेक्षा जादा तीळ असतील तर ते मेकअपने लपवले जाऊ शकत नाही. जर आपण आपल्या चेहऱ्यावरील प्रमाणापेक्षा जादा तीळ असण्यामुळे त्रस्त असाल तर या काही घरगुती उपायांनी आपण चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढून टाकू शकता.

तोंडावर तीळ काढून टाकण्यापूर्वी तीळ होण्याचे कारण काय आहे ते जाणून घ्या. जेव्हा त्वचेचे पेशी पसरण्याऐवजी एकाच ठिकाणी जमतात तेव्हा त्वचेच्या त्या ठिकाणी तीळ तयार होते.

मेलेनाइट्स पेशी त्वचेमध्ये मेलेनिन रंगद्रव्ये बनवण्याचे काम करतात, जेव्हा जेव्हा पेशी त्वचेच्या एका ठिकाणी जमा होतात तेव्हा त्या ठिकाणी तीळ बनतात. क्लिनिकल लेझर उपचार करून हि चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढून टाकले जाऊ शकतात. परंतु लेझर उपचार खूप महाग असू शकतात.

चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढून टाकण्यासाठी अपल साइडर व्हिनेगर उपयोगी आहे. यासाठी अपल साइडर व्हिनेगरचे काही थेंब कापसावर घ्या. आणि ज्या भागावरील तीळ काढून टाकायचा आहे त्या भागावर लावा. साधारणपणे 4 ते 5 तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने काही दिवसात तीळ नाहीसा होइल.

बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल तीळ काढून टाकण्यासाठी वापरले जाऊ शकते. यासाठी थोडासा बेकिंग सोड्या मध्ये एरंडेल तेलाचे  काही थेंब मिसळून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ज्या भागावरील तीळ काढून टाकायचा आहे त्या भागावर लावाथोड्या वेळाने आपला चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा ही पेस्ट चेहर्यातवर लावा. आपल्या त्वचेवर बेकिंग सोडा वापरताना जळजळ होत असेल तर बेकिंग सोडा वापरू नका.

कांद्याच्या रसातील अमीनो एसिड सल्फॉक्साईड आणि सल्फेनिक एसिड तीळ काढून टाकण्यासाठी उपयोगी आहे. चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढून टाकण्यासाठी, कांद्याचा रस ज्या भागावरील तीळ काढून टाकायचा आहे त्या भागावर लावा. एक तास तसेच राहूद्या. मग चेहरा पाण्याने धुवा. दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्याने तीळ नाहीसा होइल.

आपल्याला चेहऱ्यावरील तीळ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page