साधारणत वयाच्या तिशीनंतर त्वचेतील कोलेजीनची निर्मिती मंदावते आणि त्यामुळे त्वचा सैल पडून सुरकुत्या दिसू लागतात. परंतु सतत प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. आजकाल तरूण वयात ही बऱ्याच स्त्रियांच्या चेहऱ्यावर, मानेवर सुरकुत्या पडू लागल्या आहेत.
सुरकुत्या पडण्याची सुरुवात सर्वात आधी आपल्या मानेपासून होते. म्हणूनच आज आपण आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय बघणार आहोत.
आपली त्वचा कोरडी असल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी थोडसे बदाम कोमट कोमट करून त्याने आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर मालिश करा.
असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील आणि मानेवरील त्वचेचं रक्ताभिसरण सुधारेल आणि मानेवरच्या त्वचेला तजेलदारपणा येईल. आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी एक पिकलेला टॉमेटो आणि पपईच्या काही खापा मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये चमचाभर गुलाबजल आणि ग्लिसरीन मिसळून चांगली पेस्ट बनवून घ्या.
हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर 20 मिनिटे लावून ठेवा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने तुमचा चेहरा अधिक तजेलदार दिसेल आणि तुमची त्वचाही उजळेल. तसंच सुरकुत्या नाहीशा होऊन तुम्ही अधिक तरूण दिसू लागाल.
सुरकुत्या कमी करण्यासाठी काही बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा. सकाळी साले काढून दुधासोबत बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चांगल्या परिणामासाठी हा उपाय महिन्यातून तीन वेळा तरी करा. बदामामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी अंड्याचा पांढऱ्या बलकामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि टॉमेटो चा गर मिसळून ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटानंतर चेहरा धुऊन घ्या. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी हा उपाय करा.
यामुळे आपल्या त्वचेला पोषण मिळते. चेहरा अधिक तजेलदार दिसतो. आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.