तणाव, पुरेशी झोप न घेण्यामुळे, आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे अगदी कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे त्वचा सैल पडल्यामुळे होत.
आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन आपला चेहरा परत पहिल्यासारखा तजेलदार दिसू लागेल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आपण केळीचा वापर करू शकता यासाठी एक पिकलेली केळी कुस्करून बारीक करून आपल्या चेहऱ्यावर लावा.
सुकल्यावर पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. दुधात भिजवलेल्या बदामाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने बदामामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्यावर कोरफड गर चेहऱ्यावर लावा. कोरफड गर चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतील. पिकलेल्या टोमॅटोचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याला पोषण मिळते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते.
रात्री झोपताना बदामाचे तेल थोडेसे कोमट करून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याला पोषण मिळते. चेहऱ्याला आलेला कोरडेपणा कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.