चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यावर मुरुम, फोड, पिंपल्स येतात यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. आपला चेहरा सुंदर दिसावा अस प्रत्येक महिलेला वाटत असत मात्र चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेला मेकअप काढला नाही तर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

पि’रियड्स आणि गरोदरपणात शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. आपली त्वचा तेलकट असेल तर वातावरणातील धूळ, माती चेहऱ्यावर साचून आपल्या त्वचेला असणाऱ्या लहान लहान छिद्रांमधून शरीरातील घाम बाहेर पडत नाही, आणि चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात.

म्हणूनच आज आपण चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी काही सोपे आणि घरच्या घरी करता येतील असे खास उपाय जाणून घेणार आहोत. चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी रात्रीच्या वेळी पिंपल्स असलेल्या ठिकाणी हलक्या हाताने मध लावा आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका.

असे केल्याने चेहऱ्यावर असणारे पिंपल्स हळहळू कमी होतील. मधामध्ये एन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात. पिंपल्समुळे चेहरा लालसर झाला असल्यास, चेहऱ्यावर सूज आलेली असल्यास रात्री झोपायच्या आधी 1 चमचा ग्रीन टी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा.

सकाळी चेहरा पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी होईल. चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी रात्रीच्या वेळी पिंपल्स असलेल्या ठिकाणी कोरफड जेल लावल्याने देखील चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

कोरफड हे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. कोरफड जेल लावल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा देखील कमी व्हायला मदत मिळते.

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी आपल्याला पोट साफ ठेवावे लागेल. तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे थांबवावे लागेल. बाहेरून आल्यानंतर चेहरा पाण्याने धुवायची सवय लावावी लागेल.

आपल्याला चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page