चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

सुंदर चेहरा आपल्या व्यक्तीमत्वाला अधिक प्रभावी बनवण्याचं काम करतो; म्हणूनच आपण चेहऱ्याची सगळ्यात जादा काळजी घेतो. मात्र आजकाल वाढत्या धूळ आणि प्रदुषणामुळे तसेच शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे.

चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी आज आपल्याला अशा काही सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील पिंपल्स घालवू शकाल.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने कोरफड गर लावा. रात्रभर राहूद्या सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

कोरफड गरामध्ये असणारी  पोषण तत्त्वे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येईल तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील आणि पिंपल्समुळे पडलेले डाग देखील कमी होतील.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा कडूलिंबाच्या पानांची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्याने आपल्याला लवकर फरक दिसून येईल.

चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा वाफ घ्या. वाफ घेतल्याने चेहऱ्यावर जमा झालेली मृत त्वचा निघून जाईल तसेच मुरूम देखील कमी होतील.

बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे कारण हे व्यवस्थित पोट न साफ होणे हे देखील असत त्यामुळे शक्य तितका हलका आहार घेण्याला प्राधान्य द्या. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर तेलकट, मसालेदार अन्नपदार्थ खाणे, मांसाहार करणे टाळा.

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी चेहरा दिवसातून दोन वेळा पाण्याने धुवा तसेच दिवसभरात कमीतकमी 4 लिटर पाणी प्या. पिंपल्स हाताने, नखाने फोडू नका त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडू शकतात.

आपल्याला चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page