सध्या लग्नसराई सुरु आहे, आपल्याला एखाद्या लग्नाला जायचं आहे, किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे अन नेमके तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसत आहेत. अशा वेळी एखादा दिवसआधी हे काही पिंपल्स घालवण्याचे घरगुती उपाय आपण करून बघू शकता.
चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे सूज आली असेल तर अशावेळी एका पातळ सुती कपड्यामध्ये बर्फाचे लहान तुकडे घ्या. त्यानंतर हलक्या हाताने पिंपल्स आलेल्या भागावर थोडा वेळ (20 सेकंद) शेकवा. असे केल्याने सूज कमी होईल.
पिंपल्स घालवण्यासाठी चार चमचे घट्ट दही एका वाटीत घ्या त्यामध्ये दोन चमचे मध मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स आलेत त्या भागावर लावा. 20 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी एका वाटीत 2 चमचे मुलतानी माती घ्या त्यामध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून पेस्ट बनवून हलक्या हाताने हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीशे व्हायला मदत होईल.
पिंपल्स घालवण्यासाठी पिकलेली केळी हाताने मॅश करून लावा, काही वेळ राहूद्या नंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. आपल्याला चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.