चेहऱ्यावरील मुरुम काही दिवसात बरे होतात, परंतु त्यांचे डाग बऱ्याच काळापर्यंत चेहऱ्यावर राहतात. मुरुमांच्या या डागांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. त्याचप्रमाणे चिकन पॉक्समुळे बऱ्याचदा त्वचेवर डाग पडतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.
चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग घालवण्यासाठी कोरफड हे एक वरदान मानलं जातं. कोरफडाच्या गरामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. यातील इन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबायल घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळते.
मुरूमांसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर नियमित थोड्याशा कोरफडाच्या गरामध्ये आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून लावल्यास चेहर्या वर ग्लो येईल तसेच चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग घालवण्यासाठी चंदन पावडर गुलाबपाण्यात किंवा दुधामध्ये मिसळून आपल्या चेहऱ्याला लावा. अर्धा तास राहूद्या त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग घालवण्यासाठी आपण मधाचा वापर करू शकता. मधामध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व जास्त प्रमाणात आढळतात. चेहऱ्यावरील डाग असणाऱ्या ठिकाणी मधाचे काही थेंब लावा. 1 ते 2 तास तसेच राहूद्या त्यानंतर पाण्याने धुऊन टाका. काही दिवसात मुरुमाचे डाग नाहीसे होतील.
चांगल्या परिणामासाठी आपण मधामध्ये लिंबाचा रसही मिसळू शकता. आपल्याला चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.