चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या त्वचेला कडक ऊन, धूळ, प्रदूषण यांचा सामना करावा लागतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावर, मानेवर काळे डाग अर्थात डार्क स्पॉट्स दिसू लागतात. डार्क स्पॉटस म्हणजे आपल्या शरीरावरील एखादा भाग इतर त्वचेपेक्षा गडद रंगाचा होणे. चेहऱ्यावर काळे डाग आल्यावर आपण सर्वप्रथम काय करतो?

मेडिकलमध्ये जातो; आणि चेहऱ्यावरील डाग कमी व्हावेत यासाठी एखादी केमिकलयुक्त क्रीम घेऊन येतो. आपल्या चेहऱ्याची त्वचा नाजूक असते त्यामुळे बऱ्याचदा अशा क्रीम चेहऱ्याला सूट होत नाही. म्हणूनच आज आपण चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हळद आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी हळदीचा वापर करता येऊ शकतो. यासाठी एका भांड्यात १ चमचा मध घ्या, त्यात २ चमचे हळद आणि थोडासा आणि लिंबाचा रस मिसळा.

यानंतर ही पेस्ट त्वचेवर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हा उपाय 30 दिवस केल्यानंतर आपल्याला त्याचे पाहिजे तसे परिणाम दिसून येतील. (जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा रस घालू नका.)

पपईमध्ये असे गुणधर्म असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. पपईच्या मदतीने आपण आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा (डेड स्कीन) काढून टाकू शकता. यासाठी एका भांड्यात पिकलेल्या पपईचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

त्यानंतर हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहूद्या नंतर संपूर्ण चेहऱ्याची हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाऊन आपला चेहरा पहिल्यासारखा चमकदार आणि उजळ होईल.

रात्री झोपायच्या आधी चेहरा धुऊन त्यावर कोरफड जेल लावा सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा पाण्याने धुऊन टाका असे केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील.

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते जे काळे डाग कमी करण्यास मदत करते. यासोबतच बदामाचे तेल त्वचा मुलायम होण्यासही मदत करते. काळे डाग दूर करण्यासाठी हातावर थोडेसे बदाम तेल घ्या. हलक्या हाताने ते आपल्या त्वचेवर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने काळे डाग कमी व्हायला मदत मिळते.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. माहिती आवडली असेल तर पोस्ट शेयर करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page