डागरहित सुंदर त्वचेसाठी घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यावर हार्मोन बदलांमुळे, धूळ, प्रदूषण यामुळे पिंपल्स येतात; काही काळानंतर चेहऱ्यावरील पिंपल्स जातात मात्र ज्या ठिकाणी पिंपल आले होते तिथे डाग पडतात. म्हणूनच आज आपण पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी एका वाटीत 2 चमचे तांदळाचे पीठ घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाबजल मिसळून हलक्या हाताने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण 30 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. हा उपाय आठवडाभर केल्याने आपल्याला फरक दिसू लागेल.

चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी आपण रात्री झोपायच्या आधी चेहरा धुऊन त्यावर कोरफड जेल लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा हा उपाय सलग 30 दिवस केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात, त्वचा नितळ होते.

दही आणि हळद पावडर एकत्र करून स्क्रब तयार करा. आठवड्यातून एकदा हा स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होईल, चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाईल आपला चेहरा पहिल्यापेक्षा उजळ दिसू लागेल.

चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी आपण पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्याला लावून हलक्या हाताने घासा असे केल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होईल चेहऱ्यावरील डाग नाहीशे होतील.

आपल्याला सुंदर त्वचेसाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page