चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरावरील चरबी आपण आहारात योग्य तो बदल करून, शारीरिक व्यायाम करून करू शकतो; बऱ्याचदा आपले वजन कमी झाले तरी ही आपल्या चेहऱ्यावरची चरबी काय कमी होत नाही. अशावेळी नेमक काय करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी पहिला घरगुती उपाय

चेहऱ्यावरील आणि मानेवरची चरबी कमी करण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार आपण जाणून घेणार आहोत. यासाठी पाठ सरळ ठेवून कुठेतरी बसा त्यानंतर वर आकाशाकडे, छताकडे बघा. त्यानंतर तुमचा खालचा ओठ तुमच्या वरच्या ओठाच्या वर ठेवण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा असे करताना आपली नजर छताकडे असली पाहिजे. फक्त 5 सेकंद या पोझमध्ये रहा त्यानंतर आपले डोके पुन्हा सुरुवातीच्या स्थितीमध्ये आणा, हि क्रिया 10-15 वेळा नियमितपणे करा. आणि फरक पडल्यावर आम्हाला नक्की सांगा.

सेल्फीा काढण्या ची आवड आपल्यापैकी बऱ्याच जणींना असेल सेल्फी काढताना पाउट केल जात. सेल्फी काढताना पाउट करणे खरतर एक चांगला व्यायाम प्रकार आहे; ज्याला फिश मुद्रा अस म्हटल जात.

फिश मुद्रा केल्याने चेहरा टोन व्हायला मदत होते आणि गालाचे स्नायू ताणले जातात. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फिश मुद्रा करताना आपले गाल 5 सेकंद आतमध्ये खेचून धरा. नंतर परत पूर्वस्थितीत या. हि क्रिया 10-15 वेळा करा. आपला चेहरा टोन होईल.

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी अजून एक व्यायाम प्रकार आपण जाणून घेऊयात यासाठी आपण खाली बसा त्यानंतर आपल्या हाताचे मधले बोट आपल्या भुवयांच्या मध्ये ठेवा, त्यानंतर आपल्या दोन्ही भुवया वरती करा.

5 सेकंदाने परत पूर्वस्थितीत या हि क्रिया 10-15 वेळा करा. इथे एक लक्षात घ्या हाताने भुवया खेचायच्या नाही आहेत. भुवया वरती केल्याने आपल्या चेहऱ्यावर ताण येऊन चरबी कमी होते.

आपल्या शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर आणि त्याविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करा. आपल्याला चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या कमेंटस आम्ही वाचत असतो त्यामुळे कमेंट नक्की करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page