चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येत असतात. चेहऱ्यावर अनावश्यक केस असल्यास त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. चेहऱ्यावरील केस कायमचे काढून टाकण्यासाठी लेझर उपचार पद्धती असते.

जी महागडी तर असतेच शिवाय तिचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आज आपण घरच्या घरी चेहऱ्यावरील अनावश्यक केस कसे काढता येऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी एका पातेल्यात 2-3 चमचे साखर, थोडेसे मध आणि लिंबाचा रस घेऊन मंद आचेवर गरम करा. हे मिश्रण गरम होत असताना लाकडी चमच्याने सतत ढवळत राहा; तळाशी चिकटू देऊ नका. हळूहळू ह्या पेस्टचा रंग हलका तपकिरी सोनेरी होऊ लागेल. तेव्हा गॅस बंद करा आणि पेस्ट थोडी थंड होऊ द्या.

नंतर चेहऱ्यावर ज्या ठिकाणी केस आहेत त्याठिकाणी थोडीसी पावडर लावा आणि नंतर हे मिश्रण वॅक्स स्ट्रिपवर लावून आपल्या अपरलिप्सवर 10-12 सेकंद थापून ठेवा. त्यानंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने पट्टी एका स्ट्रोकमध्ये ओढा. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील अनावश्यक केस निघून जातील.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी छोट्या वाटीत पिकलेली केळी कुस्करून घ्या त्यामध्ये थोडेसे ओट्स मिसळून स्क्रब तयार करा हे स्क्रब आपल्या अपरलिप्सवर साधारण 10 मिनिटे राहूद्या नंतर हाताने चोळून हे स्क्रब काढा. ह्या उपायाने देखील चेहऱ्यावरील अनावश्यक केस निघून जातात.

आपल्याला चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page