चेहऱ्यावर येणारे पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणातील धूळ, प्रदूषण यामुळे चेहऱ्यावर जी घाण साचत असते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची अजून हि काही कारण आपण आज जाणून घेणार आहोत; तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आज आपण समजून घेणार आहोत.

आता आपण चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारण समजून घेऊयात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल असंतुलनामुळे, पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास, त्वचा खूप तेलकट किंवा खूप कोरडी असल्यास जंक फूड आणि तळलेले पदार्थ आपल्या आहारात असतील तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

आता आपण चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास ते घालवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी रात्रीच्या वेळी पिंपल्सवर थोडेसे मध लावा आणि सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

काही दिवस हा उपाय केल्याने आपल्याला नक्की फरक दिसू लागेल. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात.

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी थोडेसे गुलाबजल घ्या, त्यात चिमूटभर हळद मिसळा आणि पेस्ट तयार करा. आता ते पिंपल्सवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने पिंपल्स कमी होतील.

चेहऱ्यावर कोरडेपणा आलेला असल्यास कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण त्यावर कोरफड जेल लावू शकता. कोरफड हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असत. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर थोडेसे कोरफड जेल लावा सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपला चेहरा नितळ होऊन जाईल.

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी आपण आहारात पचायला हलके असणारे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या असुद्या, चेहरा धुण्यासाठी फक्त पाण्याचा वापर करा.

रात्री झोपण्याच्या आधी मेकअप उतरवून चेहरा धुतल्याशिवाय झोपू नका. रात्री पुरेशी झोप घ्या. मानसिक तणाव घेऊ नका. पुरेसे पाणी प्यायची सवय स्वताला लावा. आपल्याला चेहऱ्यावर येणारे पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page