चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते; शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे, जंक फूड खाण्याची सवय, प्रदूषण, धूळ, हलक्या प्रतीची केमिकल युक्त सौंदर्यप्रसाधने वापरल्याने आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात.
बाजारात पिंपल्स घालवण्यासाठी बऱ्याचश्या क्रीम आहेत मात्र त्या क्रीम वापरल्याने बऱ्याचदा पिंपल्स येणे वाढते, त्वचा लाल पडते, चेहऱ्याला खाज येते म्हणूनच आज आपण चेहऱ्यावर आलेले “पिंपल्स’’ घालवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे. आंघोळ 30 मिनिटे आधी मुलतानी माती गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावा. हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स लवकर नाहीशे होतील.
हार्मोनल असंतुलनामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आले असल्यास तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ खाणे बंद करा, रात्रीचे जागरण करू नका, जेवणाच्या वेळा पाळा, दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश करा. दिवस भरात 3 लिटर पाणी प्या.
आठवड्यातून एकदा तरी टोमेटोच्या गराचा लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावा. टोमेटोच्या गराचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स सुकून चेहरा तजेलदार व्हायला मदत होते.
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यासाठी दररोज दिवसातून कमीत कमी 3 वेळा चेहरा पाण्याने धुवायची सवय स्वताला लावा. असे केल्याने चेहऱ्यावर असणारी धूळ, घाण धुतली जाईल. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफड गर जेल लावल्याने चेहरा तजेलदार होतो, चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
आपल्या चेहऱ्याची त्वचा नाजूक असते; त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी, पिंपल्स कमी होण्यासाठी केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करू नका.
बऱ्याचदा हि प्रसाधने वापरणे थांबवल्यानंतर त्वचा पहिल्यापेक्षा खराब होते म्हणून चेहऱ्यासाठी सौंदर्यप्रसाधने निवडताना आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने निवडा. चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील ते नखाने फोडू नका; पिंपल्स फोडल्याने त्या जागी डाग पडतात.
आपल्याला चेहऱ्यावर आलेले “पिंपल्स’’ घालवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.