चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरगुती उपाय

आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याला चेहऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम होऊन बऱ्याच वेळा चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड येतात. चेहऱ्यावर आलेल्या मुरूमामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते.

त्वचेवर ग्लो नसण्याचे अजून एक कारण म्हणजे पोट साफ नसणे. जर तुमचे पोट साफ नसेल तर चेहऱ्यावर मुरूम यायला लागतात. अशा वेळेस चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम कोरफड करते. कोरफडमध्ये असलेले पोषक घटक आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. चेहरा ग्लो करण्यासाठी, चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी, काळे डाग कमी करण्यासाठी कोरफडीचा गर काढून काही वेळ चेहऱ्यावर लावून ठेवा.

कोरफड गर सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन काढा. काही दिवसातच आपला चेहरा चमकदार दिसेल. आपल्या चेहऱ्याच्या प्रत्येक समस्येवर चंदन हा रामबाण उपाय आहे.

चंदनाचे मुख्य कार्य कांती उजळ करणे हेच आहे. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी चंदनाचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा. जर तुम्ही हा उपाय आठवडाभर रोज केलात तर लवकरच आपला चेहरा उजळलेला दिसेल.

चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि काळेपणा कमी करण्यासाठी तसंच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी आपण दुध पावडर वापरू शकता. यासाठी दोन चमचे दुध पावडर घ्या त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा.

त्यानंतर आपल्या सम्पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर ते मिश्रण हलक्या हाताने लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय केल्याने आपला चेहरा उजळ आणि चमकदार दिसू लागेल.

लग्न कार्यामध्ये हळद समारंभ होतो. हळद लावण्यामागे मुख्य कारण त्वचा खुलवणे हाच असतो. त्यामुळे त्वचेसाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे. हळदीमध्ये थोडेसे दूध अथवा पाणी घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा. मिश्रण पूर्ण सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. काही दिवसात तुम्हाला तुमचा चेहरा तजेलदार दिसेल.

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बऱ्याचश्या महिला बेसन पिठाचा वापर करतात. बेसन पिठामध्ये गुलाबजल आणि थोडीशी हळद मिसळून ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावर उजळपणा येईल. बेसन पिठामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे चेहरा ग्लो करेल.

पोट साफ नसेल तर चेहऱ्यावर मुरूम येतात म्हणून पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी भरपूर पाणी प्यायची सवय लावा. पुरेसे पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेची आद्रता टिकून राहण्यास हि मदत होते. त्वचेचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी आपण अती तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

आपल्याला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page