उन्हामुळे चेहरा काळवंडला असल्यास करा हे घरगुती उपाय

प्रखर उन्हामुळे सगळ्यात जास्त आपल्या त्वचेचे नुकसान होत असते. आपल्या चेहऱ्याची त्वचा हि नाजूक असते. चेहऱ्याची त्वचा तेलकट असेल चेहरा काळवंडतो, चेहऱ्यावर पिंपल्स येतात. म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील सन टॅनिंग झटपट घालवू शकता.

चेहऱ्यावरील सन टॅनिंग घालवण्यासाठी काकडी तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये चमचाभर लिंबू रस मिसळून हे मिश्रण हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावर चोळा. सुकल्यावर पाण्याने चेहरा धुऊन टाका. आपल्याला लगेच फरक दिसून येईल.

चेहरा उजळण्यासाठी थोड्याश्या जाड्या भरड्या बेसन पिठामध्ये हळद पावडर आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने उन्हामुळे काळवंडलेला चेहरा उजळेल.

चेहऱ्यावर चंदनाचा लेप लावल्याने देखील चेहरा उजळतो. यासाठी एका वाटीत 2/3 चमचे चंदन पावडर घ्या त्यामध्ये गुलाबजल मिसळून हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाने चेहरा परत पहिल्यासारखा होईल.

उन्हामुळे चेहरा काळवंडू नये यासाठी उन्हात बाहेर पडताना चेहरा स्कार्फच्या सहाय्याने झाकून घेत चला. चेहऱ्याला सनस्क्रीन लावून मग बाहेर पडा.

आपल्याला चेहऱ्यावरील सन टॅनिंग झटपट घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page