चेहरा उजळण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय

वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि तीव्र सूर्यप्रकाशाचा आपल्या त्वचेवर परिणाम होऊन चेहरा काळपट दिसू लागतो अशा वेळी आपला चेहरा तजेलदार करण्यासाठी हे काही घरगुती उपाय आपण करू शकता.

चेहरा उजळण्यासाठी रात्री झोपायच्या अर्धा तास आधी कोरफड जेलने चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

काही दिवस हा उपाय नियमित केल्याने आपल्या चेहऱ्यावर आलेला काळपटपणा कमी होईल तसेच चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाऊन आपला चेहरा परत पूर्वीसारखा तजेलदार होईल.

चेहरा उजळण्यासाठी एका वाटीत दोन चमचे बेसन आणि एक चमचा हळद पावडर घ्या त्यामध्ये थोडेसे दुध मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा.

अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाचा फरक आपल्याला लगेच दिसेल मात्र आपण हा उपाय आठवड्यातून दोन वेळा नियमित केला तर आपला चेहरा कायमच तजेलदार दिसू शकतो.

आपल्या चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यासाठी आपण स्वताला या काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जर आपल्या आहारात तेलकट, मसालेदार गोष्टी असतील तर त्या खाणे थांबवा अथवा कमी करा.

तेलकट मसालेदार अन्नपदार्थांच्या ऐवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले अन्नपदार्थ खा. जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील.

या बरोबरच दिवसभरात 3 ते 4 लीटर पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातात; आणि त्वचा निरोगी चांगली राहते. आपल्याला चेहरा उजळण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page