चेहरा गोरा होण्यासाठी, उजळण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणात असणाऱ्या धूळ, प्रदूषण यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. काळपट दिसू लागते. आपल्या आहारात तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात असल्यास त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात. म्हणूनच आज आपण चेहरा उजळवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चेहरा उजळवण्यासाठी एका वाटीत 2 चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर चोळा काही वेळ राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाने आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल.

चेहऱ्यावर डेड स्कीनमुळे देखील काळपटपणा येतो; चेहऱ्यावरील डेड स्कीन घालवण्यासाठी संत्र्याच्या सुकवलेल्या सालीची पावडर एका वाटीत घ्या त्यामध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा.

हलक्या हाताने चोळा काही वेळानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाईल. चेहरा गोरा होण्यासाठी बटाटा किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. काही वेळ राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

चेहरा गोरा होण्यासाठी चांगले पिकलेले टॉमेटो मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका.

आपल्याला फरक दिसून येईल. आपल्याला चेहरा गोरा होण्यासाठी, उजळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page