छातीत जळजळणे प्रभावी उपाय

आपल्यापैकी बऱ्याच जणांना हॉटेल, रेस्टॉरंटमधील तेलकट, मसालेदार आणि पचायला जड असणारे पदार्थ खायला नक्कीच आवडत असेल; तर सांगायचा मुद्दा असा कि असे तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्याने, रात्री व्यवस्थित आणि पुरेशी झोप न घेतल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या होण्याचा धोका असतो. म्हणूनच आज आपण छातीत जळजळ होत असल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याची माहिती घेणार आहोत.

छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी आपण आवळ्याचे ज्यूस पिऊ शकता. आवळ्याचे ज्यूस प्यायल्याने आपल्याला काही वेळात आराम मिळेल. छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी एक चिमुटभर ओवा चांगला चावून खा. ओवा खाल्याने आपल्याला आराम मिळू शकतो.

जळजळ होत असल्यास तुळशीची दोन चार पाने चावून खा. असे केल्याने आपल्याला फरक पडेल. जेवण केल्यानंतर थोडीशी बडीशेप खायची सवय आपण लावली तर आपल्याला जळजळ होणार नाही.

छातीत जळजळ होऊ नये यासाठी रात्री लवकर झोपायची सवय स्वताला नक्की लावा. तसेच रात्री तेलकट, मसालेदार जेवण करू नका. बऱ्याच जणांना रात्री आंबट खाल्याने देखील जळजळीचा त्रास होतो अशांनी रात्री आंबट खाणे टाळावे. मानसीक ताण घेऊ नका.

आपल्याला छातीत जळजळणे प्रभावी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page