जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्याने, चहा, कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करण्यामुळे, रात्री जागरण केल्याने, जेवणाच्या वेळा न पाळल्याने, उपाशी राहिल्याने आपल्या पोटामध्ये आम्लाचे प्रमाण वाढून छातीत जळजळ व्हायला लागते. वेळीच यावर उपाय करणे गरजेचे असते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत्त.
छातीत जळजळ होत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात. छातीत जळजळ होत असल्यास एका पिकलेल्या केळीचे सेवन करा. आपल्याला बरे वाटेल.
छातीत जळजळ जाणवत असल्यास एक कप कोमट पाण्यात थोडासा ताजा कोरफडाचा गर मिसळून प्या आपल्याला आराम मिळेल. दुपारी जेवण केल्यानंतर एक चमचा बडीशेप चावून खाल्याने एसिडीटी होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.
नियमीत काही तुळशीची पानं खाल्याने पित्ताचा त्रास होत नाही. जेवण केल्यानंतर 1 ग्लास भर ताकामध्ये थोडीशी जीऱ्याची पावडर मिसळून प्या. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.
जेव्हा आपल्याला छातीत जळजळ जाणवत असेल तेव्हा 4 ते 5 पुदीनाची पाने चघळा. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल. छातीत जळजळ होऊ नये असे वाटत असल्यास रात्री जागरण करणे टाळा, शक्यतो बाहेरचे तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नका, जेवणाच्या वेळा पाळा, अती तिखट पदार्थ खाऊ नका. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या.
आपल्याला छातीत जळजळ होत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात. हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.