चरबीच्या गाठी घालवण्यासाठी घरगुती उपाय

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात रक्त परीसंचन व्यवस्थित होत नाही. आपल्या शरीरामध्ये एस्ट्रोजन हार्मोन्सची मात्रा घटू लागते; वजन वाढू लागत आणि मग शरीरावर चरबीच्या मऊसर गाठी यायला लागतात.

बऱ्याचदा शरीरावर गाठी येणे हे अनुवांशिक असत. चरबीच्या ह्या अशा गाठी मानेवर, खांद्यावर, हातावर, कंबरेला, पोटावर आणि मांड्यावर येतात. आज आपण काही अशा घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या मदतीने चरबीच्या गाठी घालवू शकतो.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी ग्लासभर कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस टाकून प्या. लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे शरीरातील फॅटी टिश्यू कमी व्हायला मदत होते. ह्या उपायाने शरीरामधील रक्तशुद्धीकरण प्रक्रियेला वेग मिळून चरबीच्या गाठी, शरीरातील अतिरिक कोलेस्ट्रोल कमी होईल.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी गाठ आली आहे त्या भागावर हलक्या हाताने एरंडेल तेल लावून मालिश करा. मालिश केल्याने रक्त प्रवाह वाढून गाठ कमी व्हायला मदत मिळेल.

शरीरावर आलेल्या चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण सकाळी रिकाम्यापोटी ग्लास पाण्यात 1 चमचा अपल सायडर व्हिनेगर टाकून प्या. अपल सायडर व्हिनेगर असणाऱ्या घटकामुळे शरीरातील फॅटी टिश्यू कमी होतील. शरीरामधील रक्तशुद्धीकरण प्रक्रिया चांगल्याप्रकारे होईल.

शरीरावर असणाऱ्या चरबीच्या गाठी कमी होण्यासाठी सकाळी लसणाची एक पाकळी खाऊ शकता. लसणाची पाकळी खाल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत मिळते.

शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण साधा आणि सात्विक आहार घेतला पाहिजे. नियमित शारीरिक व्यायाम केला पाहिजे याचबरोबर आहाराबाबत पुढील काही पथ्य पाळली पाहिजेत.

तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे. वेळेवर जेवण करण्याची सवय लावली पाहिजे, रात्रीचे जागरण करणे टाळल पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होणार नाही. आणि शरीरावर असणाऱ्या चरबीच्या गाठी देखील कमी होतील.

शरीरावरील चरबीच्या गाठीला हात लावल्यावर वेदना होत असल्यास अथवा गाठींच्या जागी जखम झाली असेल तर अशावेळी आपण डॉक्टरांची मदत घेऊ शकता. आपल्याला चरबीच्या गाठी घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page