आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही वेगवगळ्या आरोग्य समस्या विषयी माहिती देत असतो. आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो केले तर हि माहिती अगदी मोफत आपल्याला वाचायला मिळू शकते.
आज आपण चरबीच्या गाठी विषयी अधिक माहिती घेणार घेणार आहोत. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात हळूहळू काही बदल होत असतात. शरीराच्या आतमध्ये होणारे हे बदल आपल्याला दिसत नाही मात्र बाह्यअंगाला काही बदल झाला तर तो आपल्याला लगेच कळतो.
आपल्या शरीरावर जर गाठ आली तर ती आपल्या दिसते; मात्र हि गाठ नक्की कशामुळे आली हे आपल्याला समजत नाही. चला तर जाणून घेऊयात शरीरावर चरबीच्या गाठी नक्की कश्यामुळे येतात?
आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स असतात हे तुम्हाला माहित असेलच; आपले शरीर त्यापैकी एस्ट्रोजन हे हार्मोन्स जस वय वाढत त्यानुसार कमी प्रमाणात निर्माण करू लागत यामुळे शरीरातील रक्त परीसंचन क्रिया व्यवस्थित होत नाही. आणि मग याचा परिणाम म्हणूनच शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी गाठी यायला लागतात.
ह्या आजाराला इंग्लिशमध्ये लिपोमा असे म्हणतात. आपण शस्त्रक्रिया करून ह्या गाठी काढून टाकू शकता. बऱ्याचदा शरीरावर आलेल्या ह्या चरबीच्या गाठी न दुखणाऱ्या असतात, ह्या गाठींना हात लावला कि मऊ लागतात तो पर्यंत आपल्याला याचा काहीही धोका नसतो.
मात्र जर ह्या गाठींचा रंग इतर त्वचेपेक्षा वेगळा असेल, गाठींना हात लावल्यावर वेदना होत असतील अथवा गाठींच्या जागी जखम झाली असेल तर अशा वेळी आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आता आपण जाणून घेऊयात चरबीच्या गाठी येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे?
शरीरावर चरबीच्या गाठी येऊ नये यासाठी आपण आहारात तेलकट मसालेदार पदार्थ खाणे कमी करा. बैठे काम करत असाल तर कामाच्या दरम्यान छोटे छोटे ब्रेक घ्या आणि थोड चाला किंवा शारीरिक हालचाली करा.
आपले वजन प्रमाणाबाहेर वाढले असल्यास वजन कमी करा. नियमित शारीरिक व्यायाम, योगासने करा; चहा, कॉफी, कोल्डड्रिंक्स या गोष्टी कमीत कमी प्या, शक्य होईल तितके घरचे अन्न खा, भाज्या, फळे, कडधान्य अशा गोष्टी आहारात असुद्या पुरेसे पाणी दिवसभरात प्या.
आम्हाला आशा आहे कि; चरबीच्या गाठी कश्यामुळे येतात? चरबीच्या गाठी येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? या दोन्ही प्रश्नांची आम्ही दिलेली उत्तर आपल्याला समजली असतील आपल्याला या माहिती विषयी काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंटमध्ये विचारू शकता.
आपल्या ओळखीच्या ज्यांना पण हा त्रास होत असेल त्यांना ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये टॅग करा. आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.