चरबी कमी करण्यासाठी, मुळव्याधीचा त्रास घालवण्यासाठी प्या हे चमत्कारीक ज्यूस

आज आपण कोहळा ह्या फळाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. कोहळयापासून बनवलेला पेठा आपण नक्कीच खाल्ला असेल! कोहळ्यामध्ये एन्टी ऑक्सीडेन्ट, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, रिबोफ्लेविन, थायमिन, नियासिन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, असे अनेक औषधी गुणधर्म असतात.

आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण सकाळी कोहळ्याचे ज्यूस पिवू शकता. कोहाळ्याचे ज्यूस प्यायल्याने शरीरातील सर्व हानिकारक पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते.

कोहळ्यात अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या शरीरात निर्माण होणारा ताण बर्याँच प्रमाणात कमी होतो. याच्या सेवनाने आपली मध्यवर्ती मज्जासंस्थाही चांगली राहते आणि स्मरणशक्तीही वाढते .

कोहळ्याचे ज्यूस प्यायल्याने आपला चयापचय दर वाढून वजन, चरबी कमी व्हायला मदत मिळते. कोहळ्यामध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. त्यामुळे आपले वजन लवकर कमी होऊ शकते.

कोहळ्यामधे फायबरचे प्रमाण जास्त असते; नियमित कोहळ्याचे ज्यूस प्यायल्याने बद्धकोष्टतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. किडनी नि’रोगी ठेवण्यासाठीही कोहळ्याचे ज्यूस फायदेशीर आहे.

मूळव्याधीचा त्रास होत असेल व शौचाच्या वेळी रक्त पडत असल्यास कोहळ्याचा ज्यूस दिवसातून 2-3 वेळा प्या आपल्याला होणारा त्रास कमी होईल. कोहळ्याचे ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहायला मदत मिळते.

लघवी साफ होत नसल्यास व लघवी करताना जळजळ होत असल्यास, उन्हाळी लागली असल्यास कोहळा ज्यूस प्यायल्याने आराम मिळतो.

तळपायांना जळवात झालेले असल्यास रात्री झोपताना तळव्यावर कोहळ्याचा कीस बांधून ठेवा, कोहळ्याचा कीस बांधून ठेवल्याने थंडावा निर्माण होऊन भेगा हळूहळू कमी होतात. कोहळ्याचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग कमी व्हायला मदत मिळते.

आपल्याला चरबी कमी करण्यासाठी, मुळव्याधीचा त्रास घालवण्यासाठी प्या हे चमत्कारीक ज्यूस हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page