चांगली झोप हवी असेल तर रात्री झोपताना चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

आपल्या शरीराला दिवसभराच्या कामानंतर पुरेश्या आरामाची गरज असते. रात्री नीट झोप लागली नाही तर. तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणतेही काम नीट करू शकत नाही. चांगल्या झोपेसाठी आरोग्यदायी आहार खूप महत्त्वाचा आहे.

आपण रात्री झोपण्याच्या आधी काय खातो यावर तुम्हाला कशी झोप लागेल हे अवलंबून असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काही या काही ठरावीक गोष्टींचे सेवन रात्री झोपायच्या आधी केल्याने रात्री नीट झोप लागत नाही. चला तर मग जाणून घेऊयात

रात्री झोपायच्या आधी चॉकलेटचे सेवन केल्याने चॉकलेटमध्ये कॅफिनमुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो. वेदनाशामक गोळ्या रात्री झोपायच्या आधी खाल्याने देखील रात्री उशिरा झोप लागू शकते.

बहुतेक लोक रात्रीच्या जेवणानंतर ज्यूस पितात. पण रात्री झोपण्यापूर्वी फळांचा रस कधीही पिऊ नये. बहुतेक फळांमध्ये आम्ल असते. यामुळे शरीरात ऍसिड रिअक्शन झाल्याने आपल्याला लवकर झोप लागणार नाही.

रात्रीच्या वेळी कॉफी किंवा चहाचे जास्त सेवन केल्यास निद्रानाश होऊ शकतो.तसेच जे लोक दररोज रात्री कॉफी पितात त्यांना पोटाच्या चरबीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहाचे सेवन करू नये.

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी सोडा किंवा कोल्ड्रिंक्स प्यायला आवडत, परंतु त्यांच्या सेवनाने अनेक गंभीर आरोग्याशी संबंधित आजार होऊ शकतात. यामुळे निद्रानाशाची समस्या वाढते तसेच बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.

आपल्याला हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page