चामखीळ घालवणे घरगुती उपाय

आपल्या शरीरावर विशेषता मानेवर, चेहऱ्यावर चामखीळ येत असतात. चामखीळ, मोस ह्या पापिलोमा व्हायरस मुळे येत असतात. तस पाहिलं तर चामखीळ ह्या आपल्या शरीरासाठी धोकादायक नसतात. परंतु मानेवर आणि चेहऱ्यावर असणाऱ्या चामखीळ मुळे शरीराच्या सुंदरतेवर परिणाम होतो.

चामखीळ घालवण्यासाठी करण्यात येणारी लेझर ट्रिटमेंट करण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात. म्हणूनच आज आपण चामखीळ घालवण्याचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

शरीरावर असणारी चामखीळ घालवण्यासाठी नियमित दिवसातून ३ वेळा कापसावर व्हिनेगर घेऊन ते चामखीळ असलेल्या जागेवर लावा. काही दिवसानंतर चामखीळचा रंग बदलेल आणि सूकून जाईल. हा उपाय सगळ्यात प्रभावी आणि वेदना न देणारा आहे.

आपल्या त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी कोरफड ही उपयुक्त औषधी वनस्पती आहे. आपल्या शरीरावर असणाऱ्या चामखीळ घालवण्यासाठी कोरफड प्रभावी आहे. यासाठी रात्री झोपायच्या आधी चामखीळ आलेल्या जागेवर कोरफड गर सुती कपड्याने बांधून ठेवा.

सकाळी झोपेतून उठल्यावर धुवून ते पोटीस सोडा आणि चामखीळ असलेली जागा धुऊन टाका. साधारणपणे 15 दिवस हा उपाय केल्याने चामखीळ सुकायला लागेल. मानेवर असणारी चामखीळ घालवण्यासाठी केळीच्या गराचा देखील वापर करता येतो.

यासाठी केळीचे बारीक गोल चकत्या करून त्या चामखीळ असलेल्या जागेवर बांधा. साधारणपणे 20 ते 25 दिवसात चामखीळ सुकून निघून जाईल. रोज झोपताना चामखीळ असलेल्या ठिकाणी नारळाचे तेल लावल्याने चामखीळ निघून जाण्यास मदत मिळेल.

कोथिंबीर बारीक चिरून त्याची पेस्ट बनवा. ह्या पेस्ट चा वापर आपण चामखीळ घालवण्यासाठी करू शकतो. कोथांबीरीची पेस्ट चामखीळ असलेल्या जागेवर पंधरा मिनिटे लावून ठेवा त्यानंतर धुवून टाका.  ह्या उपायाने देखील चांगला परिणाम होतो.

मानेवर असणारी चामखीळ घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचा देखील वापर करता येऊ शकतो यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडासा लिंबाचा रस घेऊन चामखीळ असलेल्या जागेवर 15 मिनिटे लावून ठेवा असे केल्याने चामखीळ निघून जाण्यास मदत मिळेल.

आपल्या नखाने चामखीळ खाजवू नका. खाजवल्याने चामखीळमध्ये असणारा पापिलोमा व्हायरस शरीराच्या इतर भागामध्येही पसरून तिथेही चामखीळ येऊ शकतात.

आपल्याला चामखीळ घालवणे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page