chale jaav andolan

मुंबईत सुरू झालेलं पण जगाच्या इतिहासात नोंद झालेलं चले जाव आंदोलन

Itihas

१९४२च्या चळवळीने स्वातंत्र्याची चळवळ सर्व सामान्य माणसाच्या मनात पेटवली. जगाच्या इतिहासाने या चळवळीची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्याचा असा लढा जगात कुठे झालेला नाही.

ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी अक्षरशः ओवाळून टाकले, ज्यात अनेक तरुण हसत-हसत फासावर गेले, अनेक तरुणीं देखील आंदोलनात सहभागी झाल्या. त्या माणसांना व्यक्तिगत जीवनात काही मिळवायचे नव्हते, कोणत्या पदाच्या अपेक्षेने त्यांनी हे केलेले नाही, पण जी स्वप्ने त्यांनी उराशी ठेवली होती, ती पुढच्या  पाच वर्षात पूर्ण झाली आणि भारत स्वतंत्र झाला.

९ ऑगस्ट १९४२ या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जाव चा इशारा दिला. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता.

तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच गवर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही.

‘चले-जाव’ चळवळीत रणरागिणीसारख्या चमकलेल्या अरुणा असफ अली यांनी ही चळवळ विजेसारखी तळपवळी. या चळवळी मध्ये महात्मा गांधी यांच्या सोबतच डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, युसूफ मेहरअली.. यांनी ही चळवळ जागवली होती. आपल्या आई वडिलांना आज सगळी नावे आज आठवली- तो काळ, ती वेळ, ते वातावरण हे सगळे आठवले की, अंगावर रोमांच उभे राहतील.

जगाच्या इतिहासातील शक्तिमान सत्तेविरुद्धची अजिंक्य मनाची ती निर्धार लढाई एक वेगळी लढाई ठरली. हातात बंदुका घेतलेले पोलीस आणि त्यांचा प्रतिकार शांततामय मार्गाने करण्यासाठी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत रस्त्यावर उतरलेली जनता.

फक्त कशासाठी तर ‘मला देशासाठी काहीतरी करायचे आहे,’ केवळ या जाणिवेने भारतीय मनं भारावलेली होती. त्यावेळी ना देशात फोन होते, ना वीज, ना मोबाईल, ना सोशल मीडिया. सकाळी येणारं एखाद्या गावांत येणाऱ्या एखादं वृत्तपत्र त्यातील एखाद्या बातमी ला प्रेरित होऊन संपूर्ण गाव आंदोलनात सहभागी झाले होते.

८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली. ही चळवळ उभी राहण्याचं मुख्य कारणं म्हणजे क्रिपस योजनेला अपयश, राज्यकर्त्यांची भारतीयांसाठी असलेली वागणूक, जपानी आक्रमणे यांसह इतर बऱ्याच घटनांचा तो विस्फोट होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *