बोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स लावतो. पण तरी ही बोटांवरचा काळेपणा दूर होत नाही. म्हणूनच आज आपण बोटांवरील काळेपणा दूर होण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
बोटांवर मीठ आणि लिंबू एकत्र मिसळून लावल्याने त्यावर साचलेली घाण साफ होते. तुम्ही मध्यभागी एक लिंबू कापून त्यावर मीठ लावून लिंबू आपल्या बोटांवर चांगले चोळा. बोटांवर लिंबू आणि मीठ एकत्र चोळल्याने त्यावर साचलेले काळे डाग निघून जातात.
लिंबू चांगले चोळल्यानंतर किमान 10 मिनिटे तसेच राहू द्या आणि 10 मिनिटांनंतर पाण्याने हात धुवा. आठवड्यातून तीन वेळा लिंबू आणि मीठ एकत्र करून बोटांवर लावल्याने काळपटपणा लवकर दूर होतो.
लिंबू आणि साखरेच्या साहाय्याने आपण बोटांवरील काळेपणा दूर करू शकता. यासाठी एका भांड्यात 2 चमचे लिंबाचा रस घ्या. त्यानंतर त्यात साखर टाका आणि कापसाच्या मदतीने हे मिश्रण आपल्या बोटांवर लावून चांगले चोळा. बोटांवर साखर आणि लिंबू रस चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातील आणि आपली बोट परत पहिल्यासारखी होतील.
टोमॅटोचा रस आपल्या बोटांवर लावल्याने बोट पूर्णपणे स्वच्छ होतात. आपले बोट काळे झाले असल्यास टोमॅटो बारीक करून त्याचा रस काढा. त्यानंतर हा रस कापसाच्या मदतीने आपल्या बोटांवर लावा. हा रस बोटांवर १५ मिनिटे राहू द्या आणि तो सुकल्यावर हात धुवा. टोमॅटोचा रस लावल्याने सौम्य ब्लीच होते, ज्यामुळे त्वचेवर असलेली छिद्र साफ होतात. त्वचा उजळते.
आपल्याला बोटांवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.