आयब्रो दाट असतील तर त्यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसतो. आपले डोळे सुंदर दिसण्यामध्ये भुवयांचा मोठा वाटा असतो. जर आपले आयब्रो खूप पातळ असतील तर या सोप्या टिप्सच्या मदतीने आपण आपले आयब्रो दाट करू शकता.
आयब्रो दाट बनविण्यासाठी हा सोपा उपाय आपण करून बघू शकता यासाठी अर्धा चमचा एरंडेल तेल घ्या त्यामध्ये अर्धा चमचा नारळाचे दुध मिसळून मस्करा लावण्यासाठी आपण ज्या ब्रशचा वापर करतो.
त्या ब्रशच्या सहाय्याने हे मिश्रण रात्री झोपायच्या आधी आपल्या आयब्रोज वर लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन टाका हा उपाय साधारणपणे 45 दिवस केल्याने आपल्याला चांगला परिणाम दिसू शकतो.
आयब्रो दाट बनविण्यासाठी आपण मेथीच्या दाण्यांच्या पेस्टचा देखील वापर करू शकता यासाठी चमचाभर मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट बनवा; त्यामध्ये थोडेसे बदाम तेल मिसळून हि पेस्ट आपल्या आयब्रोजवर लावा अर्धा तास राहूद्या.
नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय देखील साधारणपणे 30 ते 45 दिवस केल्याने आपल्या भुवया पहिल्यापेक्षा दाट आणि चमकदार दिसू लागतील.
आयब्रो दाट बनविण्यासाठी रात्री झोपण्याआधी आयब्रोवर कोरफड जेल लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने आयब्रो द्रुतगतीने दाट होण्यास मदत होईल.
आयब्रो दाट बनविण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता; कांद्यामध्ये सेलेनियम आणि सल्फरचे प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
हा उपाय करण्यासाठी चमचाभर कांद्याचा रस घ्या मस्करा लावायच्या ब्रशने तो आपल्या दोन्ही भुवयांवर लावा. अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाने भुवया लवकर दाट होऊ शकतात.
आपल्याला आयब्रो दाट बनविण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.