राज्याभिषेका नंतर छत्रपती शंभूमहाराजांची यशस्वी बुऱ्हाणपूर मोहीम

मुघलांच्या मुळे जेंव्हा जेंव्हा स्वराज्याची आर्थिक घडी विस्कटली तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मुघलांच्या व्यापारी शहरावर छापा टाकून त्याची वसुली केली. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला. शिवकाळात बुऱ्हाणपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. या शहराची दुसरी ओळख म्हणजे त्याकाळी बुऱ्हाणपूर ला  “दक्षिणेचे प्रवेशद्वार” म्हटले जायचे. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती ज्यात जडजवाहीर सोबत मौल्यवान वस्तूंचा व्यापार चालत असे.

महाराष्ट्रात मोगल आघाडीवर शांतता होती. औरंगाबादेत बहादूरखान हा सुभेदार होता. पण मराठ्यांविरुद्ध त्याच्या विशेष हालचाली नव्हत्या. या निमित्ताने संभाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला, तो म्हणजे बुऱ्हाणपूरवर हल्ला करायचा.

बुऱ्हाणपूर हे खानदेश सुभ्याचे राजधानीचे ठिकाण होते. तापी नदीच्या किनारी हे सुंदर शहर फारुकी नवाबांनी वसविले होते. बुऱ्हाणपूर च्या रक्षणासाठी अशिरगड हा बुलंद किल्ला होता. हे शहर त्याकाळी दख्खनचे प्रवेशद्वार होते. अकबराने संपूर्ण उत्तर हिंदुस्थान काबीज केला व आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याने बुऱ्हाणपूर जिंकून दख्खनेत प्रवेश केला होता. 

शहाजहानच्या कालखंडात संपूर्ण दख्खन पठार मोगल साम्राज्याला जोडले गेले. बुऱ्हाणपूर शहराच्या वेशीबाहेर नवाबपुरा, बहादूरपुरा, करणपुरा, खुर्रमपुरा, शहाजंगपुरा असे वेगवेगळे सतरा पुरे वसविले होते. त्यातील बहादूरपुरा हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता.

सोने, चांदी, हिरे, मोती, दागदागिने, जड’जवाहिरे, उंची वस्तू, वस्त्रे, अत्तरे आदीच्या श्रीमंत व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. सर्व सतरा पुऱ्यामध्ये श्रीमंती, ऐश्वर्य ओसंडून वाहत होते. बुऱ्हाणपूरला खानजहान हा सुभेदार होता व काकरखान अफगाण हा त्याचा सहायक अधिकारी होता.

औरंगजेब व त्याचा मुलगा अकबर यांच्यात गादीचा वाद निर्माण झाला होता. राजपूत सरदारांनी अकबराला पाठिंबा दिला त्यामुळे औरंगजेब त्या युद्धात गुंतला होता. त्याचे स्वराज्याकडे जास्त लक्ष नव्हते. पण याच काळात ओरंगजेबने हिंदू तसेच मुस्लिम नसलेल्या लोकांवर जिझिया कर लावला.

खूपच जाचक असलेल्या करामुळे हिंदू राजे व प्रजा यावर खूप नाराज होती. तसेच या जिझिया करामुळे लोकांवर खूप अन्याय करण्यात आला. जिझिया कर म्हणजे इस्लामिक राज्याने इस्लामेतर एकेश्वर धार्मिक लोकांवर लावलेला कर.

इस्लामिक राज्यांत ख्रिस्ती किंवा जू लोक हा कर देऊन जिवंत राहू शकतात. मूर्तिपूजक, अनेक-ईश्वर धर्मीय लोक हा कर भरून सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. आमच्या डाव्या इतिहासकारांच्या मते औरंगझेब हा थोर राजा होता कारण त्याने हिंदूंना सुद्धा जिझिया भरून जिवंत राहण्याची सोय केली नाहीतर त्याच्या ४ पैकी ३ सल्लागारांनी हिंदूंना धर्मांतर किंवा मृत्युदंड हीच शिक्षा सुनावली होती.

राज्याभिषेकानंतर एखादी प्रचंड लूट मोहीम आखून लूट मिळवावी व राज्याचा खजिना मजबूत करावा या हेतूने शंभूराजांनी मोघलांच्या बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला करून तेथील अठरा पुरे लुटून स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकण्याचा मनसुभा रचला. आधी संभाजी महाराज यांनी सुरत लुटणार अशी अफवा पसरवली.

बुऱ्हाणपूर ची लूट करण्याचे नेतृत्व हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवले. ३० जानेवारी १६८१ रोजी सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. सुभेदार खानजहान हा औरंगाबादेत मुक्कामाला होता. काकरखानाकडे २०० माणसांनिशी बुऱ्हाणपूराच्या रक्षणाची जबाबदारी होती. तर हल्ल्याच्या वेळी मराठ्यांकडे वीस हजारांचं सैन्य होतं.

रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले. छापा टाकण्याच्या आधी सुरत वर छापा टाकणार अशी अफवा पसरवली. याचे कारण म्हणजे शत्रूचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करणे आणि दुसऱ्या ठिकाणी हल्ला चढवणे.

संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी पहोते. या मोहिमेत शत्रूची जीवितहानी कमीत कमी होईल याची दक्षता शंभु राजांनी घेतली. या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी १ करोड हुन जास्त होनांची दौलत स्वराज्यात आणली.

मराठ्यांनी पहिला छापा थेट बहादूरपुऱ्या वर घातला. तेथील दुकानातील लक्षावधी रुपयांचा माल मराठ्यांच्या हाती आला. छापा इतका अनपेक्षित होता कि पुऱ्यातून एक माणूस किंवा एक पैदेखील हलवता आली नाही. पुऱ्यात आगी लावण्यात आल्या. त्याचा धूर वरपर्यंत गेल्यावर शहरात पत्ता लागला कि मराठ्यांचा हल्ला झाला आहे.

ताबडतोब शहराचे दरवाजे बंद केले गेले. दुसरा पर्यायच नव्हता. २०० माणसे वीस हजार फौजेचा मुकाबला कुठून करणार? एकेक करत मराठ्यांनी सर्व सतरा पुरे यथेच्छ लुटले. तीन दिवसांपर्यंत हि लुट सुरु होती. शहरातून प्रतिकार असा झालाच नाही. खबर मिळताच खानजहान औरंगाबादेहून त्वरित निघाला, पण तो मराठ्यांना गाठू शकला नाही. मराठे चोपड्यामार्गे चार पाच दिवसातच साल्हेरकडे निघून गेले. सोबत प्रचंड लुट होतीच.

Leave a Comment

You cannot copy content of this page