भूक न लागणे ही अनेकांची तक्रार असते. पोषक घटक आपल्या शरीराला न मिळाल्यामुळे आरोग्याच्या तक्रारींना आपल्याला सामोरे जावे लागते. धावपळ, मानसिक टेन्शन यामुळे देखील जेवण जात नाही.
परंतु त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराची वाढ योग्य पद्धतीने होऊन शरीरासाठी आवश्यक पोषक घटक मिळणे गरजेचे आहे. भूक वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करा. शारीरिक हालचाल नसल्यामुळे देखील भूक मंदावते. सकाळी उठून चालणे, योगासने करणे, धावणे, सायकल चालवणे या क्रिया आपली भुक वाढवण्यासाठी मदत करतात.
पचन क्रिया नीट नसेल तर आपल्याला भूक लागत नाही. अशा वेळी जेवण झाल्यानंतर ओवा, जिरे अथवा बडीशोप चघळा. कच्चे खाण्यास तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे भाजून देखील खाऊ शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया नीट होईल आणि भूक देखील वाढेल.
भूक वाढीसाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मनुके यासाठी तुम्ही मनुके दुधामध्ये भिजून अथवा पाण्यासोबत खाल्ल्यास भूक वाढते. तुम्ही मनुके कच्चे देखील खाऊ शकता.
रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास फायदा होतो. त्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आपोआप भूक वाढते.
केळी खाल्ल्याने लवकर वजन वाढते. तुमच्या आहारामध्ये एकातरी केळाचा समावेश करा. जर दररोज दोन ते चार केळी खाल्ल्यास लवकर फरक जाणवतो. केळ्यामध्ये कॅलरीज, पोटॅशियम हे घटक असतात. जे शरीराला ऊर्जा स्त्रोत, एनर्जी देण्यासह वजन वाढीसाठी देखील फायदेशीर आहेत.
बटाटा हा प्रत्येक घरात उपलब्ध असतो. रोज सकाळी 2 बटाटे उकडून खाल्ल्याने भूक वाढते. बटाट्यामध्ये कायब्रोहायड्रेट, शुगर असते. ही तुमची भूक वाढवते.
शक्यतो तळलेले बटाटे न खाता उकडलेले बटाटे खाल्ल्याने जास्त फायदा होतो. आपल्यासाठी आम्ही नियमित महत्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो ती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.