bhuk vadhivinyasathi gharguti upay

भूक वाढविण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Mahtvache

भूक न लागणे ही अनेकांची तक्रार असते. पोषक घटक आपल्या शरीराला न मिळाल्यामुळे आरोग्याच्या तक्रारींना आपल्याला सामोरे जावे लागते. धावपळ, मानसिक टेन्शन यामुळे देखील जेवण जात नाही. परंतु त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

त्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराची वाढ योग्य पद्धतीने होऊन शरीरासाठी आवश्यक पोषक घटक मिळणे गरजेचे आहे. भूक वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करा. शारीरिक हालचाल नसल्यामुळे देखील भूक मंदावते. सकाळी उठून चालणे, योगासने करणे, धावणे, सायकल चालवणे या क्रिया आपली भुक वाढवण्यासाठी मदत करतात.

पचन क्रिया नीट नसेल तर आपल्याला भूक लागत नाही. अशा वेळी जेवण झाल्यानंतर ओवा, जिरे अथवा बडीशोप चगळा. कच्चे खाण्यास तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे भाजून देखील खाऊ शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया नीट होईल आणि भूक देखील वाढेल.

खाण्याची इच्छा होत नसल्यास आपल्या आवडीचे पदार्थ खा. यामुळे आपली खाण्याची इच्छा होईल. भूक वाढविण्यासाठी आले किसून त्याचा रस काढा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा आल्याचा रस आणि मध मिसळून दिवसातून दोन वेळा प्या. असे केल्याने आपल्याला जेवण करायची इच्छा होईल.

भूक लागण्यासाठी दिवसभरात एकदा तरी ताक प्या. ताक प्यायल्याने आपल्या तोंडाला चव येईल आणि आपल्याला भूक लागेल. भूक वाढीसाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे मनुका. तुम्ही मनुके दुधामध्ये भिजून अथवा पाण्यासोबत खाल्ल्यास भूक वाढते.

रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास फायदा होतो. त्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आपोआप भूक वाढते.

केळी खाल्ल्याने लवकर वजन वाढते. तुमच्या आहारामध्ये एकातरी केळाचा समावेश करा. जर दररोज दोन ते चार केळी खाल्ल्यास लवकर फरक जाणवतो. केळ्यामध्ये कॅलरीज, पोटॅशियम हे घटक असतात. जे शरीराला ऊर्जा स्त्रोत, एनर्जी देण्यासह वजन वाढीसाठी देखील फायदेशीर आहेत.

बटाटा हा प्रत्येक घरात उपलब्ध असतो. रोज सकाळी 2 बटाटे उकडून खाल्ल्याने भूक वाढते. बटाट्यामध्ये कायब्रोहायड्रेट, शुगर असते. ही तुमची भूक वाढवते. शक्यतो तळलेले बटाटे न खाता उकडलेले बटाटे खाल्ल्याने जास्त फायदा होतो.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *