छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत – शिखर शिंगणापूर

सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावापासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर माण तालुक्यात भोसले घराण्याचे कुलदैवत श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे. या शंभू महादेवाच्या ठिकाणास ‘दक्षिण कैलास’ म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला, असे मानले जाते. या डोंगरास शंभू महादेवाचा डोंगर असे म्हणतात.

शिखर शिंगणापूरमधील हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराची उभारणी यादव राजा सिंधन याने केली, असे म्हणतात. मंदिराचे शिखर कलाशैलीने नटलेले आहे. या मंदिरातील एक घंटा ब्रिटिशांनी बनवलेली आहे.

मंदिराकडे जाताना खडकेश्वराचे मंदिर आणि शांतीलिंग स्वामींचे समाधी लागते. तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते. या मंदिराजवळ एक तळे आहे. हे तळे मालोजीराजे यांनी बांधले. शिखर शिंगणापूर मंदिरांमध्ये मोठ्या तीन दीपमाळा असून पाच मोठे नंदी आहेत.

1735 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. मंदिराला संपूर्ण बाजूने तटबंदीने वेढलेले आहे. मंदिरामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत शिखर शिंगणापूरची मोठी यात्रा भरते.

या सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळते. मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत.

चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. म्हणून या दिवशी विवाह मुहूर्तावर शंकर आणि महादेवाचा विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.

“हर हर महादेव” च्या गजरामध्ये विवाह सोहळा पार पडला जातो. रात्री बारा वाजता मंगलाष्टका म्हटल्या जातात. या विवाह सोहळ्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून भक्तांची गर्दी जमा होते. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page