भेगा पडलेल्या टाचा रात्रभरात मऊ होतील, झोपण्यापूर्वी करा हा घरगुती उपाय

आपण चेहऱ्याच्या सुंदरते कडे कायम लक्ष देतो; चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. मात्र आपण आपल्या पायांची तितकी काळजी घेत नाही त्यामुळे आपल्या टाचांना भेगा पडतात.

आपल्या आहारात पुरेसे विटामिन ई, कॅल्शिअम आणि लोह हे घटक शरीराला न मिळाल्यास त्याचा परिणाम म्हणून टाचांना भेगा पडतात किंवा टाचा फाटतात. आज आपण असे काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने आपण टाचांवरील भेगा घालवू शकता.

टाचांना भेगा पडल्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी, आपले तळपाय स्क्रबने धुऊन टॉवेलने कोरडे करा आणि त्यानंतर आपल्या टाचांवर व्हॅसलीनचा जाड थर लावा त्यानंतर पायात मोजे घालून झोपा. सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या टाचांमध्ये फरक स्पष्टपणे दिसून येईल.

धुळ, मातीमुळे टाचांना भेगा पडल्या असल्यास रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुऊन त्यावर दुधाची साय लावा, हा उपाय् रोज केल्याने टाचांवरील भेगा जातात. टाचांवरील भेगा घालवण्यासाठी आपण ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून टाचांवर लावू शकता. असे केल्याने टाचांवरील भेगा निघून जातील.

टाचांवरील भेगा घालवण्यासाठी नारळाच्या तेलाचा देखील वापर करू शकता. रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुऊन त्यावर नारळाचे तेल लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर पाय धुऊन टाका. टाचांना भेगा पडू नये यासाठी रात्री झोपताना पायात मोजे घाला. धूळ मातीत जाताना पायांची काळजी घ्या.

आपल्याला टाचांवरील भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page