भात खाल्ल्याने खरचं वजन वाढते का?

भात खाल्ल्याने लठ्ठ होतो हे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेलच. अशा समजामुळे बरेच लोक भात खात नाहीत. भात हा केवळ भारतातीलाच नव्हे तर जगभरातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जाते. पण भाताबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात.

उदाहरणार्थ, भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी भात खाऊ नये हे आणि अशी बरीच उदाहरण भाताच्या बाबतीत दिली जातात. याच कारणामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे ते आधी भात खाणे बंद करतात.

खरतर तांदूळ हे पचायला सगळ्यात सोपे असे धान्य आहे. भात हे दक्षिण भारतीय आणि कोकणातील लोकांचा मुख्य आहार असतो. भात खाल्याने वजन वाढत असत. तर कोकणातील माणस लठ्ठ झाली असती.

अनेक आरोग्य तज्ञ आणि पोषणतज्ञ वजन कमी करण्याच्या आहारात डाळ आणि तांदूळ खाण्याचा सल्ला देतात. आहारतज्ञ आणि पोषणतज्ञांच्या मते, आपण फक्त एकच पॉलिश केलेल्या तांदळाचे सेवन केले पाहिजे.

तसेच केवळ भात खाण्याऐवजी प्रथिने युक्त डाळ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या भाज्या आणि भातासोबत तूप मिसळून खा असे केल्याने, तुमच्या शरीराला आवश्यक प्रथिने आणि इतर पोषक तत्वांसह तांदूळातील कार्बोहायड्रेट्स मिळतील, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका राहणार नाही.

भात खाल्ल्याने काही लोकांचे वजन वाढण्याचे कारण म्हणजे ते भात खाण्याच्या प्रमाणाची काळजी घेत नाहीत. चपाती खाताना तुम्ही २ चपाती खाल्ल्या की ३ हे मोजणे सोपे होते.

पण भात खाताना किती भात खाल्ला गेला  हे समजत नाही अशा परिस्थितीत, बहुतेक लोक भात जास्त खातात आणि यामुळे त्यांचे वजन वाढते व लठ्ठपणाची समस्या उद्भवते. म्हणून, लहान ताटात जेवत जा.

आपल्याला भात खाल्ल्याने खरचं वजन वाढते का? याविषयीची हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page