अणुऊर्जेवर चालणाऱ्या पहिल्या भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी बद्दल जाणून घ्या

देशाच्या वैज्ञानिक प्रगतीवर त्या राष्ट्राची ओळख ठरते. अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्याची कल्पना विकसित झाली आणि १० ऑगस्ट १९४८ रोजी अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला. भारताने ही संकल्पना सत्यात उतरवून ४ ऑगस्ट १९५६ मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ मुंबईमधील तुर्भे येथे कार्यान्वित करण्यात आली.

भविष्यात लागणारी ऊर्जा लक्षात घेऊन डॉ. होमी भाभा यांनी तीन टप्प्यांमध्ये आण्विक कार्यक्रम तयार केला. आजही भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC) येथे अणुऊर्जा प्रकल्प होतात. युनायटेड किंगडम च्या साहाय्याने या प्रकल्पाची बांधणी केली गेली.

अप्सरा या अणुभट्टीचा वापर वेगवेगळ्या प्रयोगांसाठी करण्यात आला आहे. देशाच्या विविध वैज्ञानिक शोधात अप्सरा या अणुभट्टीचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. संशोधनासोबत या अणुभट्टीचा वापर radioisotopes निर्मितीसाठी केला जातो.

अप्सरा अणुभट्टीची कमाल वीज निर्मिती क्षमता १००० किलोवॅट आहे, परंतु येथे ४०० किलोवॅटपर्यंत वीजनिर्मिती केली जाते. ही अणुभट्टी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इ. क्षेत्रातील संशोधनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

आपल्याला पहिल्या भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी बद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page