भारतातील पहिला वृत्तपत्रीय कागद कारखाना कोठे आहे? जाणून घ्या

जस जसा माणसाचा विकास होत गेला तसे नव-नवीन शोध लागू लागले. माणसाच्या गरजा त्याला नवे संशोधन करण्यास भाग पाडतात. आपल्या समोर अनेक अशा गोष्टी असतात ज्यांचा पूर्ण इतिहास अथवा त्याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहिती नसते. तुम्हाला हे माहित आहे का की भारतातील पहिला वृत्तपत्रीय कागद कारखाना कोठे आहे?

भारत स्वतंत्र झाल्यानंतर इ.स. १९५६ मध्ये भारतातील पहिला वृत्तपत्रीय कागद कारखाना स्थापन करण्यात आला. हा कारखाना मध्यप्रदेश या राज्यातील नेपानगर येथे उभारण्यात आला आहे. बऱ्हाणपूर या जिल्यात असलेले हे नेपानगर आज अनेक लोकांसाठी अपरिचितच आहे.

कागद निर्मिती ही मुख्यतः झाडांपासून केली जाते. बांबूपासून मोठ्या प्रमाणात कागद तयार केले जातात. नेपा मिल ही खाजगी उद्योगाच्या दृष्टीने १९४७ मध्ये स्थापन केली गेली. १९४९ मध्ये मध्य प्रदेश सरकारने या उद्योगावर ताबा घेतला. त्यानंतर १९५९ मध्ये ही केंद्र सरकारची कंपनी बनली.

३०,००० TPA च्या स्थापित क्षमतेसह कागद उत्पादनास सुरवात झाली. नेपानगरच्या आसपासच्या जंगलात उपलब्ध होणारे बांबू आणि सलाई लाकूड हे वृत्तपत्र कागद बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल आहे. नेपा ने अलीकडेच जुनी वृत्तपत्रे वापरून इकॉनॉमी न्यूजप्रिंट तयार करण्यास सुरवात केली आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page