भारत-पाकिस्तानमधील अशी एक लढाई जी आश्चर्यकारक पद्धतीने भारताने जिंकली.

बांगलादेश मधून स्थलांतरित होण्याच्या प्रश्नावर इंदिरा गांधी वैतागल्या होत्या, तब्बल दीड कोटी भारत मध्ये स्थलांतरित झालेले आणि पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यांनी आता पाकिस्तानच्या सैन्यावर शेख मुजबीर रेहमान यांना बळ देऊन पाकिस्तानचे शह दिला होता.

१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचे बांगलादेश आपल्या हातातून जाणार याची जाणीव झाल्यानंतर भारताच्या पश्चिम सीमेवरील याह्या खानाने जास्तीत जास्त हल्ला करायचे ठरवले. त्याचा उपयोग युद्ध नंतर होणाऱ्या वाटाघाटीदरम्यान आपले पारडे जड करायचा उद्देश होता. शिवाय अमेरिकेचे मोठे पाठबळ होते पाकिस्तानच्या पाठीमागे.

पाकिस्तानचे लष्करशहा याह्याखानांनी ३ डिसेंबरला त्यांच्या वायुसेनेला भारताच्या विमानतळांवर हल्ल्याचे आदेश दिले आणि युद्धाची घोषणा केली. लगोलग सिंध-राजस्थान-विभागातील जैसलमेर भागात मुसंडी मारण्याच्या उद्देशाने ४ डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याने हल्ला चढवला.

भारताचा एक अंदाज कि राजस्थानच्या वाळवंटात एवढा प्रखर हल्ला होणार नाही . पाकिस्तानच्या ५१ Infantry Brigade ने T -५९ आणि शेरमन च्या रणगाडाच्या साहाय्याने भारताच्या लोंगेवाला आणि रामगड वर हल्ला केला त्या रात्री सीमेवरील लोंगेवाला ठाण्यावर झालेली मोठी लढाई पश्चिम सीमेवरील युद्धातील पहिली चकमक होती.

पाकिस्तानने ३००० हून अधिक सैनिक ४५ रणगाडे ५०० चिलखती गाड्या(ज्यावर दारुगोळा आणि एक दूर वरचं ठिकाण टिपणारी मशीनगन जोडलेली असते) जैसलमेर ताब्यात घेण्याच्या उद्देशाने लोंगेवाला मधून प्रवेश केला.

राजस्थान सीमेवरील जैसलमेर विभागात शत्रूचे आक्रमण थोपवून त्याला सीमापार हटवण्याच्या उद्दिष्टाने संरक्षणफळी उभारण्याची जबाबदारी २३ बटालियन (पंजाब रेजिमेंट) विभागाची होती. त्यापैकी हुसेन यांनी आपल्या बटालियनच्या चार कंपन्यांपैकी सर्वांत आघाडीचे ठाणे उभारण्याचे काम अल्फा कंपनीचे कमांडर मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांना दिले होते.

बटालियनचे मुख्यालय साधेवाला येथे होते. त्यावेळी मेजर कुलदीप सिंग ९० सैनिकांसह भारतीय सीमेच्या सुरक्षेत गुंतले होते. बीएसएफचे २९ सैनिक जवान आणि लेफ्टनंट धरमवीर हे आंतरराष्ट्रीय सीमेच्या गस्तीवर होते आणि त्यांनी मेजर कुलदीप सिंग यांना पाकिस्तानी सैन्याची एक मोठी तुकडी भारतात आल्याची खबर दिली.

लेफ्टनंट धर्मवीरने ताबडतोब मेजर कुलदीपसिंगना संपर्क केला. त्यांनी अर्थातच आपल्या वरिष्ठांशी संपर्क केला. हेडक्वार्टरमधून ताबडतोब पायदळ किंवा चिलखती गाड्या पाठवणं शक्य नव्हतं. मग पर्याय वायुदलाचा. पण वायुदलाकडे रात्रीच्या अंधारात शत्रूला टिपण्याची विशेष यंत्रणा नव्हती. त्यामुळे वरिष्ठांनी मेजर कुलदीपसिंगना दोन पर्याय सुचवले. एक म्हणजे सरळ माघार घेऊन रामगड गाठायचं किंवा दुसरं म्हणजे लोंगेवाल चौकी रात्रभर लढवायची.

१२० जवानांनी लोंगेवालावरील मोर्चेबंदीसाठी परिसरातील सर्वात उंच डोंगराची चांदपुरी यांनी निवड केली होती. सभोवतालच्या टापूवर या टेकडीचे वाळवंटी टेकडी वर असल्याने दूरवरच्या प्रदेशातील कोणतीही हालचाल चारी बाजूंनी दिसत असे. त्याचबरोबर चाल करून येणाऱ्या सैन्यावर तिथून शस्त्रांचा परिणामकारक मारा करणे सुकर होते.

जवळच अगदी मोजक्या लोकांची वस्ती असलेले लोंगेवाला हे गाव होते. ठाणे डावपेचाच्या दृष्टीने सरस आणि नामी होते. खंबीरपणे लढवले, तर त्याचा ताबा घेणे शत्रूला शक्य होणार होते. २३ पंजाबच्या अल्फा कंपनीच्या १२० जवानांनी तिथे मोर्चा उभा केला. शत्रूवर उपलब्ध शस्त्रांचा मारा करण्यासाठी पद्धतशीर खंदक खणून खणले होते.

मेजर चांदपुरी यांनी हे ठरवले कि सैनिक आणि असलेल्या शस्त्रास्त्र चा साठा जपून वापरायचा आणि पुढील मदत येऊ तोपर्यंत पाकिस्तानच्या सैनिकांना थांबवून ठेवायचे. पाकिस्तान पुढे जात होता आणि येथे सर्व काही शांत होते! मेजर ने शत्रू अगदी जवळ येईपर्यंत थांबलो. सर्वांत प्रथम गर्जली ती एकमेव आरसीएल तोफ. तिने एकामागून एक अशा दोन रणगाड्यांना उडवले.

प्रत्येक पाकिस्तानी रणगाड्यावर राखीव इंधन लादलेले होते. त्याचा प्रचंड भडका होऊन काही वेळ रणांगण उजळून गेले. नंतर भारताच्या अँटी-टॅंक गन गर्जल्या आणि ४ पाकिस्तानी टाकी हवेत उडल्या. पाकिस्तानी सैन्य आश्चर्य चकित झाले कारण हा हल्ला इतका अचानक आणि इतका तीव्र झाला होता.

पाकिस्तानी सैन्याला वाटले की संपूर्ण भागात Mines पडल्या आहेत, शत्रू तिथेच थांबला. त्यात हा परिसर थर वाळवंटात ला असल्याने इथली वाळू चिकट आहे. वेढा घालण्यासाठी चारी बाजूंना पसरलेले पाक रणगाडे वाळूत फसले. रणगाडा चालकांचे लक्ष लढाईपेक्षा आपलं वाहन वाळूतून सोडवण्याकडेच लागलं.

रात्री ठीक १२.३० ला पाकिस्तानी आक्रमण सुरू झालं. ६५ रणगाडे लोंगेवाला चौकीच्या रोखाने निघाले. ते मार्‍याच्या टप्प्यात येताक्षणी सुभेदार रतन सिंगांची रिकॉइललेस गन आग ओकू लागली. दोन्ही बाजूंनी जबर भडिमार सुरू झाला. लोंगेवाला येथे त्या रणगाड्यांना भारतीय जवानांनी पेरलेल्या रणगाडाविरोधी सुरुंगांना तोंड देणे पाक लष्कराला कठीण गेले.

लोंगेवालाची चौकी चढून भारतीयांवर हल्ले करणे पाक पायदळाला कठीण होते. त्यामुळे रणगाड्यांना दुरुनच हल्ले करणे भाग पडले. पण तरिही त्यांनी डागलेले तोफ़गोळे भारतीय जवानांनी पेरलेल्या खंदकांवरून गेल्याने खंदकात दडून बसलेले भारतीय जवान पाक लष्कराला अधिकच हैराण करत होते.

मेजर चांदपुरी आणि त्याची बटालियन रात्रभर पाकिस्तानी सैन्यासमोर उभे होते, ही परीक्षेची रात्र होती, पाकिस्तानी उर्वरित टॅंक ची हालचाली थांबली.

काटेरी कुंपणापर्यंत पोहचायलासुद्धा शत्रूला दुष्कर झाले. तिथे पोहचल्यावर भूसुरुंगांचा सुगावा लावण्यासाठी पाकिस्तानी कमांडरने सॅपर्सना पाठविले. दोन तासांच्या नाहक शोधाशोधीनंतर त्यांना कळले की, व्यक्तीविरोधी भूसुरुंग पेरलेलेच नव्हते. तोपर्यंत पहाट झाली. रात्रभर प्रयत्न करूनही शत्रू अपयशी ठरला होता. आता उजेडात ते काम आणखीनच कठीण होते.

५ डिसेंबर १९७१ रोजी सूर्याची पहिली किरण बाहेर येताच एमएस बावा यांचे विमान सकाळी सात वाजता लोंगेवाला रणांगणात उतरले. आणि हवाई दलाने पाकिस्तानी टी ५९ रणगाड्याना कमी उड्डाण करून लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळात जैसलमेर एअरफोर्स स्टेशनच्या आणखी तीन हंटर ने लोंगेवाला येथे टाक्यांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. या लढाईत पाकिस्तानचे २०० सैनिक ठार, ३४ रणगाडे उद्ध्वस्त झाले आणि ५०० चिलखती गाड्या निकामी झाल्या. शत्रूचं जास्तीत नुकसान करताना आपल्या २ जवानांना वीरमरण प्राप्त झालं.

लोंगेवालाची ही लढाई सामरिक डावपेचांच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची होती की, ब्रिटनच्या इम्पिरियल जनरल स्टाफच्या प्रमुख सेनापती फील्डमार्शल कार्व्हर हा लंडनहून मुद्दाम लोंगेवालाच्या रणक्षेत्रावर गेला आणि मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्याकडून त्याने प्रत्यक्ष सगळी माहिती करून घेतली.

जेम्स हॅटर या ब्रिटिश लष्करी तज्ज्ञ लेखकाने तर लोंगेवालाच्या लढाईला थर्मोपिलीच्या लढाईची उपमा दिली. जेव्हा आज पण तुम्ही लोंगेवाला ला गेलात तर तिथे. हे दगडावर लिहिलेले असते लिहला आहे. इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना ,लहु देकर की जिसकी हिफाजत हमने, ऐसे तिरंगे को सदा अपनी आँखों मे बसाए रखना

Leave a Comment

You cannot copy content of this page